Riteish Deshmukh: “आयुष्यातील सर्वात मोठी चूक” तब्बल १७ वर्षांनी रितेश देखमुखने केला मोठा खुलासा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Riteish Deshmukh, genelia deshmukh, riteish deshmukh news, genelia deshmukh movies, Riteish and genelia love story, Riteish Deshmukh movies

Riteish Deshmukh: “आयुष्यातील सर्वात मोठी चूक” तब्बल १७ वर्षांनी रितेश देखमुखने केला मोठा खुलासा..

Riteish Deshmukh News: अभिनेता रितेश देशमुखने महाराष्ट्राला नुकतंच वेड लावलं. रितेश आणि जिनीलिया या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

रितेश - जिनीलियाच्या नवीन सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

रितेशने याआधी लय भारी, माऊली अशा सिनेमांमधून मराठी प्रेक्षकांचं मन जिंकलं. आता रितेशने एक मोठा खुलासा केलाय. १७ वर्षांपूर्वी झालेली चूक रितेशला आता महागात पडली आहे.

("Biggest mistake in life" ved fame actor Riteish Deshmukh made a big revelation after 17 years)

रितेश देशमुखने आजवर काही सिनेमांमध्ये स्त्री पात्रांच्या भूमिका केल्या आहेत. हे सिनेमे म्हणजे 'हमशकल्स' आणि 'अपना सपना मनी मनी'.. या दोन सिनेमांमध्ये रितेशने स्त्री पात्रे साकारली आहेत.

करीना कपूरसोबत 'व्हॉट वुमन वॉन्ट' या विषयावर बोलताना रितेशने खुलासा केला की, या भूमिका करण्यासाठी, त्याला त्याचे पूर्ण शरीर वॅक्सिंग लावावे लागले.

रितेशने पुढे खुलासा केला की.. त्याकाळी माझ्यात एक वेगळाच जोश होता. तो माझ्या करियरचा सुद्धा सुरुवातीचा काळ होता.

त्यामुळे भूमिकेसाठी मी माझे आय-ब्रो सुद्धा केले. पण ते नंतर कधीच वाढले नाहीत.. आणि हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली ठरल्याचे रितेशने सांगितलं.. अशाप्रकारे रितेशने १७ वर्षांनंतर हा खुलासा केला.

वेड सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड आवडला. महाराष्ट्रातील ठिकठिकाणी वेडने हाउसफुल्लची पाटी झळकवली.

वेडला मिळणार प्रतिसाद बघून रितेशने वेड तुझा या गाण्याचं नवीन व्हर्जन आणि काही प्रसंग समाविष्ट करून वेडची नवीन कॉपी थिएटरमध्ये रिलीज करण्यात आली.

त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांनी वेड पाहायला गर्दी केली. आता वेड 28 एप्रिलला Hotstar या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीजची होत आहे.