सलमान,शाहरुखला भारी पडला कपिल शर्मा;लवकरच येणार बायोपीक

'फुक्रे' सिनेमाच्या दिग्दर्शकाकडे असणार दिग्दर्शनाची धुरा
kapil Sharma
kapil SharmaGoogle

कपिल शर्मा(Kapil Sharma) म्हणजे काही वर्षापूर्वी पर्यंत एका कॉमेडी शो चा विजेता एवढीच ओळख. पण कपिलनं त्याच्या मेहनतीने 'कॉमेडी नाइट विथ कपिल' या शो ची धुरा सांभाळली अनं तो घराघरात ओळखला जाऊ लागला. केवळ भारतातच नाहीत तर जगाच्या कानाकोपऱ्यात त्याचे फॅन आहेत. अमृतसरहून आलेल्या कपिलनं आज मुबंईत आपलं असं एक भक्कम स्थान निर्माण केलं. आजही 'कपिल शर्मा शो' नावानं तो करीत असलेल्या शो मध्ये अनेक सेलिब्रिटी येतात ज्यांना तो हसत-हसत क्लीनबोल्ड करतो. पण त्याचं कुणी वाकडं काही करू शकत नाही. उलट सेलिब्रिटींसोबत त्याची चांगलीच गट्टी जमलेली. अनेक बॉलीवूडच्या अॅवॉर्ड शो चं होस्ट करण्याची जबाबदारी त्याच्यावरच. सर्वसाधारण स्टॅंडअप कॉमेडियन ते बॉलीवूड सेलिब्रिटीपर्यंत त्यानं मजल मारलीय ती आपल्या अचूक विनोदी टायमिंगच्या कौशल्यावर.

kapil Sharma
वयाच्या २१ व्या वर्षी या गोष्टीमुळे प्रियंकाची मान लाजेनं खाली गेली

असो हे सगळं सांगण्यामागे एकच कारण की आता कपिलनं आणखी एक पाऊल पुढे टाकत सलमान,शाहरुखलाही बगल देत चक्क मोठी झेप घेतलेली आहे. बातमी आहे की त्याच्यावर आता बायोपीक येतोय. महावीर जैन हे या सिनेमाची निर्मिती करणार आहेत, तर 'फुक्रे' सिनेमाचे दिग्दर्शक मृघदिप सिंग लांबा या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या सिनेमाचं नाव 'फंकार' असं जाहीर करण्यात आलंय. याविषयी बोलताना निर्माते म्हणाले की ,''फंकार हा एक उर्दू शब्द आहे. याचा अर्थ होतो कलाकार,आर्टिस्ट. या सिनेमात कपिल शर्माच्या आयुष्यातील अनेक माहीत नसलेल्या गोष्टींवरही प्रकाशझोत टाकला जाईल. कपिलनं आतापर्यंत आपल्या विनोदी कलेच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात हास्य निर्माण केलं,त्याचा विनोद म्हणजे अनेकांसाठी एनर्जी टॉनिक आहे. त्यामुळे त्याच्यावर बनणारा सिनेमाही लोकांच्या आयुष्यात आनंद आणेल असा आम्ही प्रयत्न करू''.

kapil Sharma
शिल्पा शेट्टी अस्खलित मराठीत म्हणाली....

आता कपिल नेहमी सोशल मीडियावरील वादग्रस्त ट्वीटमुळेही चर्चेत आलेला आहे. नुकतेच नेटफ्लिक्सवर आलेल्या त्याच्या 'आय अॅम नॉट डन येट' या नव्या शो मध्ये त्याने त्या ड्रंक ट्वीटसंदर्भात भाष्य केल्याने तो चर्चेत आला होता. त्याचे हे ड्रंक ट्वीटचे किस्से,त्यावरनं घडलेले वाद सिनेमात दाखवणार की वगळणार यावर सगळ्यांचं लक्ष लागून राहिल एवढं मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com