Bipasha Karan Daughter: बिपाशा-करणने पहिल्यांदा दाखवला मुलीचा चेहरा, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bipasha basu and karan singh grover

Bipasha Karan Daughter: बिपाशा-करणने पहिल्यांदा दाखवला मुलीचा चेहरा, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

बॉलीवूडचे लोकप्रिय स्टार जोडपे बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांची मुलगी देवीचं स्वागत केलं. तेव्हापासून, हे जोडपे अनेकदा चाहत्यांना त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या लिटिल मिस सनशाइनची झलक देत आहे.

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी सोशल मीडिया पोस्टवर मुलीचा चेहरा लपवून ठेवला असला तरी आणि चाहते देवीचा चेहरा पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या जोडप्याने आपल्या लाडक्या देवीचा चेहरा दाखवला आहे.

बिपाशाने बुधवारी, 5 एप्रिल रोजी रात्री तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एका सुंदर फोटोसह तिची लहान मुलगी देवीचा चेहरा उघड केला आहे. या फोटोसोबत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "हॅलो वर्ल्ड... मी देवी आहे."

बिपाशा बसूने शेअर केलेल्या मनमोहक फोटोंमध्ये, देवी बासू सिंग ग्रोव्हर बेबी पिंक ड्रेसमध्ये अतिशय क्यूट दिसत आहे ज्यावर 'डॅडीज प्रिन्सेस' लिहिलेले आहे. बिपाशाने मॅचिंग हेअरबँडने तिचा प्रिय लूक पूर्ण केला आहे. पहिल्या फोटोत, देवी स्माईल करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत, ती कॅमेऱ्याच्या लेन्सकडे लक्षपूर्वक पाहत आहे. त्याचवेळी बिपाशा-करणच्या मुलीचा चेहरा पाहिल्यानंतर सेलेब्स आणि चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर 2015 मध्ये आलेल्या 'अलोन' चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले होते. या जोडप्याने 30 एप्रिल 2016 रोजी मुंबईत लग्न केले. लग्नाच्या सहा वर्षानंतर बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर एका लाडक्या मुलीचे पालक झाले.

बिपाशाने तिच्या गरोदरपणातील सर्व अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर केले होते. दुसरीकडे, जेव्हा करण आणि बिपाशाने त्यांच्या मुलीची बातमी शेअर केली तेव्हा चाहत्यांनी त्यांचे खूप अभिनंदन केले.