
Actress Breast Surgery : बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्रींनी केली 'ब्रेस्ट सर्जरी', नव्या लुक्सनं चाहते घायाळ
Bipasha to Mallika sherawat bollywood actress breast implant : सौंदर्यासाठी बॉलीवूडमधील अभिनेत्रींची जगभर चर्चा होत असते. केवळ भारतातच नाहीतर साता समुद्रापार भारताच्या अभिनेत्रींची लोकप्रियता आहे. यामध्ये आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, जान्हवी कपूर, श्रद्धा कपूर, मलायका अरोरा, क्रिती सेनन, दिशा पटानी यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.
आपण किती सुंदर आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न जवळपास सगळ्याच अभिनेत्री करतात. मग ती अभिनेत्री भारताची असो किंवा श्रीलंकेची किंवा ऑस्ट्रेलियाची त्या सगळ्यांनाच आपण किती सुंदर आहोत हे प्रेक्षकांना दाखविण्याची मोठी उत्सुकता असते. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या सर्जरींची चर्चा रंगलेली दिसते. त्यामध्ये प्रामुख्यानं प्लॅस्टिक सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी यांचा उल्लेख करावा लागेल. आता आपण बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करुन चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली होती.
Also Read - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
आयशा टाकीया -
बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं आयशानं चाहत्यांना थक्क करुन सोडलं होतं. भलेही ती फार काळ बॉलीवूडमध्ये रमली नाही. पण तिच्या भूमिकेनं चाहत्यांमध्ये ती लोकप्रिय झाली होती. दिल मांगे मोअर पासून आपल्या करिअरला सुरुवात केलेल्या आयशानं गेल्या काही वर्षांपूर्वी ब्रेस्ट इंम्प्लांट करुन घेतलं होतं.
कंगना रनौत -
बॉलीवूडची क्वीन असं स्वताला म्हणविणाऱ्या कंगनानं देखील प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. २००७ मध्ये कंगनानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या अभिनेत्रीनं स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंगनानं आतापर्यत ओठांची सर्जरी, नाकाची सर्जरी याशिवाय ब्रेस्ट इंप्लांट्स केले आहे. मात्र तिनं याविषयी कबूली दिलेली नसली तरी सोशल मीडियावर त्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा व्हायरल झाल्या होत्या.
बिपाशा बसू -
बॉलीवूड ब्युटी बिपाशा बसू या अभिनेत्रीनं राज या चित्रपटातून डेब्यु केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून बिपाशानं तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले आहे. बिपाशानं स्किन लायटनिंग उपचारही करुन घेतले होते.
सुश्मिता सेन -
माजी युनिव्हर्स सुष्मिता सेननं सर्जरी केली असं सांगितलं तर कुणालाही विश्वास बसणार नाही. मात्र तिनं काही वर्षांपूर्वी ब्रेस्ट इंप्लांट केल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. त्याची खूप चर्चाही झाली होती.
राखी सावंत - बॉलीवूडची क्वीन म्हणून लोकप्रिय झालेल्या राखी सावंतची गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ती तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली होती. एका मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं होतं की, करिअरच्या सुरुवातीला तिनं ब्रेस्ट इंम्प्लांट केलं होतं. मात्र आरोग्याच्या काही कारणास्तव तिनं माघार घेतली होती.
मल्लिका शेरावत -
मर्डर या चित्रपटापासून मल्लिकानं वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या मल्लिकानं देखील काही वर्षांपूर्वी ब्रेस्ट इम्प्लांट केले होते.