बिपाशाची भलतीच अट! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

बिपाशा बासू तिच्या "अलोन' चित्रपटानंतर एकाही मोठ्या चित्रपटात दिसली नाही. "अलोन'नंतर तिने अभिनेता करण सिंग ग्रोवरबरोबर लग्न केलं.

तिनं बऱ्याच काळापासून एकही चित्रपट साईन केलेला नाही अन्‌ त्यास कारण आहे करण. नाही करणनं तसा दबाव वगैरे टाकलेला नाहीय; पण त्याच्या प्रेमात वेडी झालेली बिपाशा म्हणते, माझ्याबरोबर जर करण को-स्टार असेल, तरच मी चित्रपट साईन करीन... आता ही कोणती भलतीच अट. याआधी अभिनेत्री भाग्यश्रीनंही असंच काहीसं केलं होतं. ज्यामुळे तिचं अभिनयातील करिअर फार काळ टिकलं नाही.

"मैने प्यार किया' चित्रपटाच्या यशानंतर भाग्यश्रीनं हिमालय नावाच्या एका व्यावसायिकाशी लग्न केलं. लग्नानंतर तिनं हिमालय जर माझ्या चित्रपटात काम करणार असेल, तरच मी काम करीन, अशी विचित्र अट घातली. हिमालयने कधी अभिनयही केला नव्हता. त्यामुळे भाग्यश्रीचं करिअरच संपुष्टात आलं; पण बिपाशाच्या बाबतीत तसं नाहीय. करण एक चांगला अभिनेता आहे आणि त्याचे लाखो चाहतेही आहेत. बिपाशाची अट कोणा निर्मात्यानं खरंच मनावर घेतली, तरच तिचं करिअर टिकून राहील... नाही तर या बंगाली ब्युटीचं काही खरं नाही! 
 
Web Title: Bipasha's bad condition!