Birth Anniversary : 'या' सात अभिनेत्यांनी साकारली आहे भगत सिंहांची भूमिका!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

'द लेजेंड ऑफ भगत सिंह' या सिनेमाला दोन नॅशनल आणि एक 'बेस्ट फिचर फिल्म' हे अवॉर्ड मिळाले आहेत.

मुंबई : भारतमातेसाठी आपल्या जीवाचं बलिदान देणाऱ्या क्रांतिवीर भगत सिंह यांचा 27 सप्टेंबर हा जन्मदिवस. देशभक्तीसाठी त्यांनी आनंदाने मृत्यूलाही मिठी मारली. भगत सिंह यांचा 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमध्ये एका सरदार घराण्य़ात झाला होता.

देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या भगत सिंह यांच्यावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही निघाले. त्यांची महान देशभक्ती देशातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनी चित्रपटात भगत सिंह यांची भूमिका साकारली. कोणत्या चित्रपटांत कोणत्या कलाकारांनी भगत सिंह यांची भूमिका साकारली आहे, ते पाहूया.

1. शहीद-ए-आजम भगतसिंह

Image may contain: 3 people, text 

भगत सिंह यांच्यावर बनलेला पहिला चित्रपट म्हणजे 'शहीद-ए-आजम भगत सिंह' होय. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संर्घषावर आधारीत हा चित्रपट आहे. जगदीश गौतम यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून अभिनेते जयराज यांनी भगतसिंह यांची भूमिका साकारली होती. त्यांच्याशिवाय स्मृती बिस्वास आणि अशिता मजुमदार याही मुख्य भूमिकेत होते. 

2. शहीद भगतसिंह

Image may contain: one or more people

त्यानंतर 1963 मध्ये आलेल्या 'शहीद भगत सिंह' या चित्रपटामधून शम्मी कपूर यांनी भगत सिंह यांची भूमिका साकारली होती. चित्रपटाचं निर्देशन एन. बन्सल यांनी केलं होतं. या सिनेमामध्ये अभिनेते प्रेमनाथ, उल्हास आणि अचला सचदेव ही मंडळीदेखील होती.

3. शहीद

Image may contain: 2 people, hat, beard and text

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तसेच देशभरात 'भारत कुमार' नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते मनोज कुमार यांनी भगत सिंह यांची भूमिका साकारली. त्यांच्यावर आधारीत साल 1965 मध्ये आलेला 'शहीद' हा चित्रपट मनोज कुमार यांचा चित्रपट बराच गाजला होता. 

4. शहीद-ए-आजम

Image may contain: 1 person, text

बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये क्रांतिवीर भगत सिंह यांच्यावर चित्रपट करण्यात आला. अभिनेता सोनू सूद याने 2002 मध्ये 'शहीद-ए-आजम' या चित्रपटात भगत सिंह यांची व्यक्तीरेखा साकारली. 

5. द लेजेंड ऑफ भगत सिंह

Image may contain: 3 people, beard and text

'शहीद-ए-आजम' चित्रपटासह 2002 मध्येच भगत सिंह यांच्यावर आधारीत एकूण तीन चित्रपट आले. त्यामधील एक म्हणजे 'द लेजेंड ऑफ भगत सिंह' चित्रपट होय. यामध्ये अजय देवगण याने भगत सिंह यांची भूमिका साकारली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. या सिनेमाला दोन नॅशनल आणि एक 'बेस्ट फिचर फिल्म' हे अवॉर्ड मिळाले आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं आहे.

6. 23 मार्च 1931 :​ शहीद

Image may contain: 2 people, text

साल 2000 मध्ये भगत सिंह यांच्यावर आधारीत एकूण तीन चित्रपटांमधील आणखी एक चित्रपट म्हणजे '23 मार्च 1931: शहीद'. देओल ब्रदर्स म्हणजेच सनी आणि बॉबी देओल यांनी हा चित्रपट तयार केला होता. बॉबी देओलने भगत सिंह यांची, तर सनीने चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारली. 

7. रंग दे बसंती

Image may contain: 5 people, people smiling, text

एकाच वर्षांत भगत सिंह यांच्यावर तीन चित्रपट आल्यानंतर 2006 मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिवीरांनी दिलेले बलिदान आणि सध्या देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी तरुण काय करत आहेत, यांचा सुरेख संगम घातला.

'रंग दे बसंती' या बहुचर्चित चित्रपटामध्ये आमीरने चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारली. तर भगत सिंहांच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ नारायण दिसला. त्याशिवाय सिनेमामध्ये सोहा अली खान, कुणाल कपूर, शर्मन जोशी, अतुल कुलकर्णी ही मंडळीदेखील दिसली. आजदेखील या चित्रपटाची लोकप्रियता टिकून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birth anniversary of Bhagat Singh These seven actors from bollywood have played the role of Bhagat Singh