'ब्लॅक पँथर' फेम अभिनेता चॅडविक बोसमनचं निधन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 29 August 2020

अभिनेता चॅडविक बोसमनच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी आहे. चॅडविकचं वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी निधन झालं आहे.

मुंबई- हॉलीवूडचा सुपरहिट सिनेमा ब्लॅक पँथर मधील अभिनेता चॅडविक बोसमनच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी आहे. चॅडविकचं वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी निधन झालं आहे. चॅडविकच्या निधनाने हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये शोकाकुल वातावरण आहे. चाहत्यांसोबतंच अनेक कलकार त्याच्या आठवणीत त्याला श्रद्धांजली देत आहेत. 

हे ही वाचा:  सुशांत मृत्यु प्रकरणात सिद्धार्थ पिठानी आणि दिपेश सावंत बनणार माफीचे साक्षीदार

चॅडविक बोसमन गेल्या चार वर्षांपासून कॅन्सर लढत होता. त्याला आतड्यांचा कॅन्सर होता. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चॅडविक बोसमनच्या प्रतिनिधीने सांगितलं बोसमनची पत्नी आणि कुटुंब शेवटच्या क्षणात त्याच्यासोबत होते. चॅडविक बोसमनच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाच्या वतीन अधिकृत स्टेटमेंट देखील जाहीर करण्यात आलं आहे.

Black Panther' star Chadwick Boseman dies after battle with cancer

यामध्ये लिहिलंय, 'एक खरा योद्धा, चॅडविकने त्याच्या संघर्षातून त्याचे सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले ज्याला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं.' यासोबतंच त्याच्या कुटुंबाने त्याच्या चार वर्षांच्या अभिनय कारकिर्दीसोबतंच त्याच्या सर्जरी आणि कीमोथेरपीची माहिती देखील दिली. ब्लॅक पँथर सिनेमातील टी-चाला ची भूमिका साकारणं ही त्याच्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट होती. 

चॅडविकच्या जाण्याने त्याचे चाहते दुःखी झाले आहेत. ब्लॅक पँथर मधील त्याच्या भूमिकेने त्याने अनेकांच्या मनात घर केलं होतं.

black panther star chadwick boseman dead from colon cancer at 42


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: black panther star chadwick boseman dead from colon cancer at 42