सलमाननं न्यायालयात सादर केलं खोटं प्रतिज्ञापत्र, नंतर मागितली माफी

Blackbuck Poaching Case Salman Khan Apologies For  Mistakenly Giving Fake Affidavit
Blackbuck Poaching Case Salman Khan Apologies For Mistakenly Giving Fake Affidavit

मुंबई -  अभिनेता सलमान खानला काळवीट शिकारप्रकरणी अद्याप दिलासा मिळालेला नाही. आपल्याकडून चूकीनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं गेल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र त्याप्रकरणामुळे त्याच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचे दिसून आले आहे. 1998 साली सलमाननं जोधपूर येथे दोन काळवीटाची शिकार केली होती. त्यावरुन त्याच्यावर वन्यजीव प्राणी कायदातर्गत गुन्हा दाखल झाला होता. ते प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. यातून बचावासाठी सलमाननं नाना त-हेचे पर्याय अवलंबले असले तरी त्याला त्यात यश आलेले नाही.

काळवीट शिकार प्रकरणात सलमानकडे जेव्हा न्यायालयानं शस्त्राचा परवाना मागितला त्यावेळी त्यानं तो हरवल्याचे सांगितले होते. मात्र ते खोटे असल्याचे 18 वर्षानंतर लक्षात आले आहे. त्य़ाप्रकरणावर आता येत्या तारखेला न्यायालय निकाल देणार आहे. सलमाननं आता 17 व्यांदा कोर्टाकडे माफीनामा सादर केला आहे. त्यासाठी त्यानं उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. याशिवाय त्यानं आपल्याला पुढील सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहता येणार नसून ऑनलाईन उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. 17 वेळा सलमाननं काळवीट शिकार प्रकरणावर न्यायालयाकडे माफीनाम्यासाठी अर्ज केला आहे. सहा फेब्रुवारीला त्याला तारखेसाठी न्यायालयात उपस्थित राहणे बंधनकारक होते. मात्र तसे झाले नाही.

मंगळवारी सलमाननं जोधपूर न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी माफी मागितली आहे. 2003 मध्ये त्यानं हे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. काळवीट प्रकरणावर गुरुवारी न्यायालय आपला निर्णय देणार आहे. त्यावेळी सलमाननं आपल्याला उपस्थित राहता येणार नाही असे सांगितले असून व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयानं द्यावी असे आपल्या मागणी पत्रात म्हटले आहे. आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार सलमानचे वकिल हस्तिमल सारस्वत यांनी सांगितले की, 8 ऑगस्ट 2003 मध्ये कोर्टाकडे चूकीचं प्रतिज्ञापत्र सादर केले गेले होते. त्यासाठी सलमाननं माफी मागितली होती.

सलमानच्या वकिलानं सांगितले की, सलमानचा वाहन परवाना हा नुतनीकरणासाठी दिला होता. तसेच तो त्याच्या कामात व्यस्त असल्यानं त्याला परवाना न्यायालयात सादर करता आला नाही.  1998 मध्ये जोधपूरमधील कनकनी गावात सलमाननं दोन काळवीटांची शिकार केली होती. त्यावेळी त्याच्यावर आर्म्स अॅक्ट नुसारही कारवाई करण्यात आली होती.काळवीटाच्या शिकार प्रकरणी कोर्टानं 5 एप्रिल 2018 मध्ये सलमानला दोषी मानले होते. त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यात सह आरोपी असणा-या अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्बु आणि सोनाली बेंद्रे यांना कोर्टाकडून दिलासा  मिळाला होता. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com