
Bloody Daddy Release Date : शाहिद कपूरचा 'ब्लडी डॅडी' थिएटरमध्ये दाखवणं शक्य नाही! निर्मात्यांनी सांगितलं कारण..
Bloody Daddy Release Date : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचा ब्लडी डॅडी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मात्र तो थिएटमध्ये प्रदर्शित न होता ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरची फर्जी नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता.
आता शाहीदच्या नव्या चित्रपटानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळेल असे सांगण्यात येत होते. मात्र तसे होताना दिसत नाही. यावर फिल्ममेकर्स अब्बास अली यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. शाहिदचा हा चित्रपट ओटीटीवर येणार आहे. आयपीएलनंतर जिओ सिनेमा तुफान चर्चेत आलं आहे. त्यामुळे की काय आता नवीन चित्रपट देखील ओटीटीवर येण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!
ब्लड डॅडी शिवाय या ओटीटीवर कच्चे लिंबू आणि इन्सपेक्टर अविनाश या कलाकृती ओटीटीवर येणार आहेत. ब्लड डॅडी ही फिल्म स्लिपलेस नाईट या फ्रेंच चित्रपटाचा रिमेक असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटावरुन गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावरुन होताना दिसते आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर माध्यमांशी शाहिद कपूर आणि अली अब्बास यांनी संवाद साधला.
अब्बास अली यांनी म्हटले आहे की, ब्लडी डॅडीची गोष्ट सांगण्यासाठी मला ओटीटीसारखा प्लॅटफॉर्म गरजेचा आहे. तो थिएटरमध्ये प्रदर्शित करु दिला जाणार नाही. त्याचे कारण त्यातील आशय हा भलताच तिखट आहे. आणि तो पास केला जाईल असे वाटत नाही. त्यामुळे मला ब्लडी डॅडी थिएटरमध्ये प्रदर्शित करायला भीती वाटते. अशी प्रतिक्रिया अली अब्बास यांनी दिली आहे.
तुम्ही जेव्हा काहीतरी वेगळं करु पाहता तेव्हा त्याला वेगळे मुल्य प्राप्त होते. आणि केवळ एकच प्रेक्षकवर्ग डोळयासमोर ठेवून चालत नाही. तुम्हाला वेगळा विचार करावा लागतो. तेव्हा सातासमुद्रापलीकडेही माझा आशय प्रेक्षकांपर्यत पोहचावा असा उद्देश आहे. असेही अब्बास यांनी यावेळी सांगितले.