OTT Release This Week: 'ब्लडी डॅडी'पासून ते 'अवतार 2' या आठवड्यातील OTT रिलीज घ्या जाणून.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OTT Release This Week:

OTT Release This Week: 'ब्लडी डॅडी'पासून ते 'अवतार 2' या आठवड्यातील OTT रिलीज घ्या जाणून..

OTT Release This Week:  जूनचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. या आठवड्यात घरबसल्या ओटीटीवर तुमचे भरपूर मनोरंजन होणार आहे. आता घरबसल्या ओटीटीवरील सिरिज आणि चित्रपटांमुळे तुमचे भरपूर मनोरंजन होणार आहे.

जुनचा हा आठवडा खूपच मनोरंजनात्मक असणार आहे. या आठवड्यात अनेक दर्जेदार सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.

या आठवड्यात प्रेक्षकांना अॅडव्हेंचरपासून थ्रिलरपर्यंतचा डोस मिळणार आहे. अॅक्शन, रोमान्स, विनोद अशा वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

शाहिद कपूरच्या 'ब्लडी डॅडी'पासून ते जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार 2' पर्यंत अनेक चित्रपट आणि मालिका OTT वर प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहे.

जुन महिन्यात OTT वर प्रसारित 'हे' चित्रपट होणार आहेत. कधी, काय आणि कुठे प्रदर्शित होत आहे यावर नजर टाकूया...

'ब्लडी डॅडी'

फर्जीनंतर शाहिद या चित्रपटातुन OOT वर पुन्हा एकदा एंट्री करणार आहे. शाहिदच्या बहूप्रतिक्षित या चित्रपटात थ्रिलर सपेन्स या सर्व गोष्टींचा आनंद मिळणार आहे. शाहिद कपूर स्टारर हा सिनेमा अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला आहे. 9 जून 2023 रोजी Jio सिनेमावर तो पाहता येणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर शाहिद कपूर चे चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी खुपच उत्सूक आहेत.

Arnold Schwarzenegger Docu Series On Netflix

हा एक माहितीपट असून हा हॉलिवूड अभिनेता अरनॉल्डवर आधारित आहे. या चित्रपटाच्या माध्यमातुन अभिनेत्याचा संपूर्ण प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी हा एक उत्तम चित्रपट असणार आहे. 'अर्नॉल्ड' हा माहितीपट ७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. जो प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सच्या डॉक्युसिरीजमध्ये अरनॉल्डच्या संपूर्ण कारकिर्दीचा सारांश आहे. त्याच वेळी, त्याची बॉडीबिल्डिंग कारकीर्द 1977 च्या पम्पिंग आयर्न या माहितीपटात दाखवली गेली. 

Never Have I Ever Season 4:

नेव्हर हॅव आय एव्हर या सिरिजच्या तिन भागांनी गेल्या प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन केलं आहे. त्याच्या तीनही सिझनला प्रेक्षकांनी खुप प्रेम दिल आहे. आता त्याचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा चौथा सिझन 8 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

'UP 65'

उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर डझनभर वेब सिरीज आहेत. कधी गुन्हेगारी, कधी यूपीचे राजकारण तर कधी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर कथा रचल्या गेल्या आहेत. आता या यादीत आणखी एका वेब सीरिजने येत आहेत जिचं नाव आहे. 'UP 65'.

ही सिरिज 8 जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये गुटर गुन फेम जय ठक्कर, सोनू के टीटू की स्वीटी फेम प्रीतम जैस्वाल आणि ये रिश्ता क्या कहलाता है फेम अनमोल ज्योतिर हे कलाकार आहेत.

'अवतार 2'

जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. खास गोष्ट म्हणजे छोट्या स्क्रीनवरही तुम्ही 4K च्या अल्ट्रा एचडी क्वालिटीमध्ये पाहू शकता. हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

 दिग्दर्शक जेम्स कॅमेरून दिग्दर्शित या सायन्स फिक्शन चित्रपटाने रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने व्हिज्युअल इफेक्ट्स श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कार 2023 जिंकला आहे.

हा चित्रपट ७ जूनला डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून या सिनेमाची वाट पाहत आहेत.