बोधित्सव' चित्रपट महोत्सवात पाटेकरांचा सन्मान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई : "बोधित्सव' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेते नाना पाटेकर यांना चित्रपट आणि सामाजिक कार्यातील योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. 
"बोधित्सव' चित्रपट महोत्सव ग्रामीण स्नेह फाऊंडेशनच्या वतीने 16 ते 23 फेब्रुवारीदरम्यान पाटण्यात (बिहार) भरवण्यात येणार आहे. महोत्सवात सव्वाशे चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवात महेश भट्ट, प्रियांका चोप्रा, केतन मेहता, शत्रुघ्न सिन्हा हे दिग्गज सहभागी होणार आहेत. महोत्सवाचे संचालक पंकज श्रेयस्कर यांनी, महोत्सवासाठी 122 देशांमधून आलेल्या 3543 चित्रपटांमधून 125 चित्रपट निवडण्यात आले आहेत. 
 
Web Title: Bodhitsav film festival