Aamir Khan: मुंबईचा पाऊस, आमिर - आझाद खानचा फुटबॉल!

बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईल आणि भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून आमिर खानकडे पाहिले जाते.
Aamir Khan
Aamir Khan esakal

Bollywood News: बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईल आणि भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून आमिर खानकडे पाहिले जाते. (Bollywood Actor) येत्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याचा लाल सिंग चढ्ढा नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्तानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा हिंदी रिमेक लाल सिंग चढ्ढा (Laal Chaddha Singh) या नावानं प्रदर्शित होणार आहे. त्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्यात करिना कपूर, विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या आमिर आणि त्याच्या मुलाचा आझादचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे.

आज, बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा आझादसोबतचा (Social media viral video) एक व्हिडिओ चर्चेत आहे ज्यामध्ये आमिर आपल्या मुलासोबत फुटबॉल मॅचचा खेळताना दिसत आहे. मुंबईच्या पावसात, आमिर आणि त्याचा मुलगा पहिल्या पावसाचा आनंद घेत आहेत. या व्हिडिओमध्ये ही पिता-पुत्राची जोडी पूर्णपणे फुटबॉलमध्ये मग्न झाली आहे. आमिर खानसाठी त्याचा मुलागा सर्वस्व आहे. आमिर अनेकदा त्याला खेळासाठी प्रोत्साहीत करताना दिसला आहे कारण खेळ हे प्रत्येकाच्या तंदुरुस्ती आणि वैयक्तिक वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

Aamir Khan
Aamir Liaquat Death: मीम म्हणून फेमस असलेल्या नेत्याची Controversial लाइफ

आमिर एक उत्तम क्रीडा निरीक्षक आणि क्रीडाप्रेमी असून प्रत्येक खेळात उत्सुकता दाखवण्यासाठी प्रसिद्ध आहे. टेबल टेनिसपासून ते कुस्ती आणि क्रिकेटपर्यंत प्रत्येक खेळाकडे आमिरचा कल असतो. तो केवळ खेळात रस घेत नाहीत तर त्यात आपल्या मुलांनाही सहभागी करून घेतो. दरम्यान, त्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, तो लवकरच लाल सिंग चड्ढा या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Aamir Khan
Viral Video: शिल्पाला असं कधी पाहिलयं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com