Video: दादा एका ट्रीपचे किती घेणार? अजयच्या उत्तरानं कपिलची बोलती बंद

अजय देवगणचा रनवे 34 नावाचा चित्रपट प्रदर्शनाच्या (Ajay Devgn) उंबरठ्यावर आहे.
Ajay Devgn movie
Ajay Devgn movie esakal

Tv Entertainment news: अजय देवगणचा रनवे 34 नावाचा चित्रपट प्रदर्शनाच्या (Ajay Devgn) उंबरठ्यावर आहे. त्यानिमित्तान अजय हा प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (Run Way 34 Movie) अजय त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शो मध्ये आला होता. त्यावेळी कपिलनं त्याची फिरकी घेतली. मात्र अजयनं त्याला दिलेल्या जशास तशा उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अजयच्या या चित्रपटाकडून त्याच्या (Bollywood News) चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. यापूर्वी त्याच्या भुजला (Bollywood Actor) प्रेक्षकांनी नाकारले होते. त्या तुलनेत शेरशहाला मोठं यश मिळालं होतं. त्यानंतर अजयची एक वेब सीरिज देखील प्रदर्शित झाली होती. त्याला देखील नेटकऱ्यांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. रनवे 34 बाबत यापूर्वी देखील अजयनं आपल्याला मोठ्या अपेक्षा असल्याचे मुलाखतीतून सांगितले होते.

अजय त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शो मध्ये आला होता. त्यावेळी कपिलनं त्याला तू विमानाच्या एका ट्रीपसाठी किती पैसे घेतो असा प्रश्न कपिलला विचारला होता. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे त्यात कपिलनं अजयला तो पायलट झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. कपिल अजयला म्हणतो, सर आम्ही आता अमेरिका, कॅनडाला शो करण्यासाठी जाणार आहे. आम्हाला त्याठिकाणी सोडण्याचे किती पैसे घेणार असा प्रश्न कपिलनं अजयला विचारला. अजयनं उत्तर दिलं की, भाऊ ही विमानाची ट्रीप आहे. त्यावेळी कुठलाही धोका पत्करता कामा नये.

Ajay Devgn movie
KGF 2 Song Viral: यशचा 'सुलतान' अवतार नेटकऱ्यांना भावला, सोशल मीडियावर चर्चा

अजयच्या रनवे 34 विषयी सांगायचे झाल्यास ही घटना 2015 सालच्या वास्तव घटनेवर आधारित आहे. ही कथा कॅप्टन विक्रांत खन्ना यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येते. ती भूमिका अजय देवगणनं साकारली आहे. अजयनं केवळ महत्वाची भूमिकाच नाहीतर या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. अजयच्या यापूर्वीच्या दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास त्यानं यु मी और हम नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मात्र तो चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला होता. अजयच्या या चित्रपटामध्ये महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांच्याही भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com