Happy Birthday Akshay Kumar : अक्षय कुमार असा ठरला बॉलिवूड 'खिलाडी'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 सप्टेंबर 2018

'सौगंध' या सिनेमातून अक्षय कुमारने करिअरची सुरवात केली. नव्वदच्या दशकात अक्षयने अनेक सिनेमे केले. 1992 साली त्याचा 'खिलाडी' सिनेमा रिलीज झाला. जो सर्वाधिक यशस्वी ठरला. 'खिलाडी' या सिनेमांच्या सिरीजमुळे अक्षय कुमार सिनेसृष्टीचा खिलाडी झाला.

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार याचा आज (ता. 9) वाढदिवस आहे. 51 वर्षीय अक्षय कुमारने सिनेसृष्टीतील त्याच्या सुरवातीच्या काळापासून ते आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिलेत. पण केवळ सिनेमा क्षेत्रातच त्याचं नाव आदराने घेतले जात नाही तर याशिवाय महिला सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी नेहमी आपला हात आपुलकीनं पुढे करणाऱ्या काही निवडक सेलिब्रेटींपैकी तो एक आहे. शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यावर देखील तो अनेकदा विविध कार्यक्रमातून बोलत असतो. खऱ्या आयुष्यातही अक्षय एक शिस्तप्रिय आणि मेहनती व्यक्ती म्हणून ओळखला जातो.
 

'सौगंध' या सिनेमातून अक्षय कुमारने करिअरची सुरवात केली. नव्वदच्या दशकात अक्षयने अनेक सिनेमे केले. 1992 साली त्याचा 'खिलाडी' सिनेमा रिलीज झाला. जो सर्वाधिक यशस्वी ठरला. 'खिलाडी' या सिनेमांच्या सिरीजमुळे अक्षय कुमार सिनेसृष्टीचा खिलाडी झाला. 1995 साली 'सबसे बडा खिलाडी' सिनेमा रिलीज झाला आणि हाही हिट ठरला. खिलाडी हा शब्द असलेले सिनेमे प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरू लागले. 1996 मध्ये 'खिलाडीयो का खिलाडी' सिनेमा रिलीज झाला. ज्यात अभिनेत्री रेखा आणि रविना टंडन यांची प्रमुख भुमिका होती. सिनेमातील रेखा बरोबरच्या अक्षयच्या बोल्ड सीनची नंतर बरीच खुसखुशीत चर्चाही झाली. 1997 साली 'मिस्टर अॅण्ड मिसेस खिलाडी' हा सिनेमा आला. जो फारसा चालला नाही. त्यानंतर 1999 साली दिग्दर्शक उमेश मेहरा यांचा 'इंटरनॅशनल खिलाडी' सिनेमा आला. ज्यात ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार अशी जोडी सिनेमात बघायला मिळाली. या सिनेमाने बॉस्क ऑफिसवर काही खास गल्ला जमवला नाही. 2000 साली आलेल्या 'खिलाडी 420' या सिनेमातील अक्षय कुमारच्या अॅक्शन सीन्सचे विशेष कौतुक करण्यात आले. 2012 मध्ये अक्षयचा 'खिलाडी 786' हा सिनेमा आला. पण हाही सिनेमा हिट झाला नाही.

‘स्पेशल 26’, ‘बेबी’, ‘एअरलिफ्ट’, ‘रुस्तम’ यांसारखे बरेच सुपरहिट चित्रपट अक्षय कुमारने बॉलिवूडला दिले. 'हेरा फेरी', 'फिर हेरा फेरी', 'गरम मसाला', 'वेलकम', 'भागम भाग', 'दिवाने हुए पागल', 'खट्टा मिठा', 'मुझसे शादी करोगे', 'हाउसफुल', 'हाउसफुल 2', 'हाउसफुल 3', 'दे दना दन', 'जॉली एल एल बी' या कॉमेडी सिनेमांतून अक्षय कुमारने प्रेक्षकांना खळखळून हसविले. कॉमेडी सिनेमातील भुमिकांनीही अक्षयने वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'टॉयलेट: एक प्रेम कथा' आणि 'पॅड मॅन' सारखे सिनेमे करुन अक्षयने सामाजिक स्तरावर जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला आहे. 
 

अक्षयने त्याच्या करिअरमध्ये अनेक चढउतार बघितले. वयाच्या 8व्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले आहे. तेथे त्याने आचारी आणि वेटरचे काम देखील केले.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Kicking the midweek blues like #FitIndia #FitLife

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

भारतीय सिनेमासृष्टीतील अक्षयच्या योगदानासाठी 2008 साली ‘युनिर्व्हसिटी ऑफ विण्डसर’ने त्याला कायद्यातील मानद पदवी देऊन

सन्मानित केले आहे. अक्षयचा '2.0' हा सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ज्यात अक्षयच्या लुकचे पोस्टर व्हायरल होत आहे.  

2.0 akshay kumar

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood Actor Akshay Kumars Birthday Special