Pm Narendra Modi
Pm Narendra Modi

'मोदी पुन्हा जिंकणार!, या अभिनेत्याच्या आईनं दिले आशीर्वाद

बॉलीवूडमध्ये (Bollywood) देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या प्रभावाची माहिती अनेकांना आहे.

PM Narendra Modi: बॉलीवूडमध्ये (Bollywood) देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या प्रभावाची माहिती अनेकांना आहे. त्यांच्यावर आधारित काही चित्रपटही प्रदर्शित झाले आहे. बॉलीवूडमध्ये (Bollywood) अनेक दिग्दर्शक आणि निर्माते, अभिनेते हे मोदींच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झाले आहे. यापैकी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतची (Bollywood Actress Kangana Ranaut) नेहमीच चर्चा होत असते. आता मोदी आणि त्यांच्यावर वेगळी टिप्पणी करणाऱ्या एका अभिनेत्याची आई चर्चेत आल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे त्या अभिनेत्याच्या आईनं मोदीं पुन्हा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होतील. असं भाकित वर्तवलं आहे. त्यांनी मोदींना यासाठी आशीर्वाद दिले आहेत.

कोरोना महामारी असताना 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी दिल्लीतील लाल किल्ल्यावर अनेक सुंदर प्रदर्शनं प्रेक्षकांना पाहता आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यांचाही सहभाग होता. त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुमप खेर यांच्या आईनं मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. खेर यांच्या आईनं मोदींना पुढील निवडणूकीत विजयी होण्याचा आशीर्वाद दिला आहे. त्याची चर्चा आता सोशल मीडीयावर सुरु झाली आहे. खेर यांनी आपली आई दुलारी यांच्यासमवेत काही व्हिडिओ आणि फोटो शेयर केले आहेत.

Pm Narendra Modi
Video: राष्ट्रपती भवनावर ड्रोन्सच्या माध्यमातून कलाविष्कार

खेर यांनी कु अॅपवरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्यांच्या मातोश्रींनी मोदींना आगामी निवडणूकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पुढल्या निवडणूकीमध्ये देखील मोदींचाच विजय होईल. असं त्यांनी सांगितलं आहे. त्या व्हिडिओमध्ये खेर आईंना विचारतात की, प्रजासत्ताक दिनाची परेड पाहिली का? त्याचं उत्तर देताना आई म्हणतात की, सकाळी दोन ते तीन तास परेड पाहिली. ती पाहून आनंद वाटला. यावेळी खेर यांनी मोदीविषयी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर खेर यांच्या आईनं मोदी यांना सलाम करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Pm Narendra Modi
Video: रश्मीजींनी तिरंग्याला सॅल्यूट केला नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com