मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील हॉट कपल म्हणून ओळखले जातात. त्यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडते. अर्जुन आणि मलायकाने अजूनही अधिकृतपणे त्यांच्या नात्याचा खुलासा केलेला नाही. यामुळे अनेकदा ते मीडियापासून लांब राहतात. फार कमीवेळा ते एकत्र मीडिया समोर आले आहेत.
अभिनेत्री करीना कपूर आणि सैफला काही दिवसांपूर्वी मुलगा झाला. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी करीना आणि सैफच्या बाळाला पाहण्यास हजेरी लावली. नुकतेच मलायका आणि अर्जुन सैफच्या घरी आले. या वेळी मीडिया देखील तेथे उपस्थित होती. मलायका आणि अर्जुन कारमधून उतरताच फोटोग्राफर्सने फोटो घेण्यासाठी गर्दी केली. यावेळी अर्जुनने एका फोटोग्राफरमधील व्यक्तीला फटकारले. हा व्यक्ती एका भिंतीवर चढून अर्जुन आणि मलाईकाचा फोटो काढत होता. त्यावेळी या फोटोग्राफरला अर्जुनने भिंतीवर चढण्यापासून थांबवले. पण त्या व्यक्तीने त्याचे ऐकले नाही.
अर्जुन ओरडल्याने तो फोटोग्राफर पळायला लागला. त्यामुळे अर्जुन चिडला आणि म्हणाला,'ओ लाल शर्टवाले भाईसाहाब डर कर क्यु भाग रहे हो?'. त्यानंतर मीडियामध्ये गंभिर वातावरण निर्माण झाले. सैफ आणि करिनाला भेटून झाल्यावर अर्जुन बिल्डिंग खाली आला. त्यावेळी फोटोग्राफरने त्याची माफी मागितली त्यावेळी तो म्हणाला,' मला काही प्रोब्लेम नाही पण बिल्डिंगवाले ओरडू शकतात.'त्यानंतर अर्जुनने फोटोसाठी पोज दिली.
मलायका अरोराचा 2016 साली अरबाज खान सोबत घटस्फोट झाला. त्यानंतर आता मलायका अर्जुन कपूर सोबत डेट करत आहे. मलायकाला अराहन नावाचा मुलगा आहे. मलायका तिच्या सोशल मीडियावर फिटनेसच्या टिप्स टाकत असते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.