Arshad Warsi Birthday: पहिलाच चित्रपट झाला होता फ्लॉप,तीन वर्षे होता 'बेरोजगार'

अर्शद वारसीने त्याच्या अभिनय करियरची सुरूवात १९९६ साली 'तेरे मेरे सपने' या त्याच्या पहिल्या चित्रपटाने केली होती.
Arshad Warsi Birthday: Arshad Warsi was jobless for three years
Arshad Warsi Birthday: Arshad Warsi was jobless for three years esakal

बॉलीवूडच्या जगात एक वेगळीच ओळख असणारा अर्शद वारसी मूळचा मुंबईचाच.त्याची ही ओळख बणवण्यासाठी त्याला मात्र खूप मेहनत घ्यावी लागली होती.(Munnabhai MBBS)या अभिनेत्याचा जन्म १९६८ मधे मुंबईत झाला होता.त्याच्या पहिल्या चित्रपटातून त्याच्या हाती अपयशच पडले.आणि त्या नंतर त्याला पुढचे तीन वर्ष चित्रपटात काम मिळाले नव्हते.आज अर्शद वारसीचा वाढदिवस आहे.अर्शद वारसीला आज सगळेच ओळखतात,पण मात्र त्याला जी प्रसिद्धी आज मिळाली आहे त्यामागील संघर्षही तेवढाच मोठा होता.

अर्शद वारसीने त्याच्या अभिनय करियरची सुरूवात १९९६ साली 'तेरे मेरे सपने' या त्याच्या पहिल्या चित्रपटाने केली होती.'तेरे मेरे सपने' या चित्रपटाला अभिनेता अमिताभ बच्चनच्या प्रोडक्शन हाउस एबीसीएलच्या बॅनर अंतर्गत बनवल्या गेले होते.परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसमधे पाहिजे तशी धमाल केली नाही आणि त्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला.त्यामुळे नंतरच्या दिवसात त्याला काम मिळणे कठीण झाले.त्याचा चित्रपट क्षेत्रातील हा संघर्ष जवळपास तीन वर्ष चालला.या काळात त्याच्या हाती चित्रपट तर नव्हतेच पण इतर कुठले कामही त्याच्या हाती नव्हते.

Arshad Warsi Birthday: Arshad Warsi was jobless for three years
Fabulous Life of Bollywood Wives-2 च्या दुसऱ्या पर्वाचं चित्रीकरण पूर्ण

अरशद वारसीची पत्नी मारिया गोरेटी हीने मात्र त्याची साथ दिली.त्याच्या कठीण काळात ती हिमतीने त्याच्या सोबत उभी राहिली.अरशदला चित्रपटात काम मिळावं यासाठी तो या क्षेत्रात तीन वर्ष वण वण फिरला.या काळात अर्शदची पत्नी मारियाच्या पगाराने घर चालायचे.याबद्दल स्वत: अर्शदने त्याच्या 'इरादा' चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी सांगितले होते.संघर्ष या चित्रपटानंतर मात्र अर्शदचे सोनेरी दिवस सुरू झालेत.२००३ मधे आलेल्या 'मुन्ना भाई एमबीबीएस' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसमधे धमाल केली.या चित्रपटातील त्याची 'सर्किटची' भूमिका आजही लोकांच्या आठवणीत आहे.गोलमाल सीरीज, धमाल, जॉली एलएलबी, इश्किया अशा अनेक चित्रपटांतून त्याने प्रेक्षकाची मनं जिंकली आहे.बच्चन पांडे या चित्रपटात देखिल या अभिनेत्याची भूमिका बघायला मिळतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com