चक्क मुलालाच हॉटेलमध्ये विसरुन आली अभिनेत्याची पत्नी

बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ही एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.
 चक्क मुलालाच हॉटेलमध्ये विसरुन आली  अभिनेत्याची पत्नी

मुंबई - बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ही एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं केलेला उद्योग. आणि तिचा विसराळु स्वभाव यामुळे तिला अनेकदा समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. मात्र अद्यापही तिचा विसराळुपणा कमी झालेला नाही. याबद्दल अभिनेता आयुषमाननं खुलासा केल्याचे दिसून आले आहे. याशिवाय ताहिरानं देखील त्या किश्श्यांविषय़ी सांगितलं आहे. त्याविषयी चाहत्यांना माहिती झाल्यावर त्यांनी तााहिराला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या आहेत.

2012 मध्ये ताहिरानं एका मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव विराजवीर असे ठेवले होते. पुढे काही दिवसांनी ते एका हॉटेलमध्ये ते लंचसाठी गेले होते. तेव्हा तिथे जेवण घेतल्यानंतर आयुषमान आणि ते हॉटेलबाहेर पडले. मात्र ती आपल्या मुलाला घेण्यास विसरली. हे ऐकुन त्या दोघांनाही कमालीचा धक्का बसल्याचे दिसुन आले. ताहिरा कमालीची घाबरली होती. आपण काय करावं असा प्रश्न तिला पडला. मात्र सुदैवानं त्या हॉटेलमधील वेटर त्यांच्या मदतीला धावून आला होता. त्यावेळी तो त्यांचा पाठलाग करत बाहेर आला. आणि त्यानं तो मुलगा ताहिराच्या हातात दिला.

वेटरनं सांगितलं होतं की, मॅडम तुम्ही तुमचा मुलगा हॉटेलमध्ये विसरला होतात. त्या दिवसाला मी अजूनपर्यत विसरलेले नाही. त्यावेळी सगळ्यांनी मला असा लूक दिला होता की, मी तो काही केल्या विसरु शकत नाही. अजूनही त्या नजरेतून प्रतीत होणारा अर्थ मला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. अशी प्रतिक्रिया ताहिरानं दिली होती.

 चक्क मुलालाच हॉटेलमध्ये विसरुन आली  अभिनेत्याची पत्नी
आर्यन खान प्रकरणी राजकीय आरोपांमधून चित्रपटाची सुरस ; कथा मिळण्याची चर्चा
 चक्क मुलालाच हॉटेलमध्ये विसरुन आली  अभिनेत्याची पत्नी
'आर्यननेच मला शाहरुख-गौरीला फोन करायला सांगितलं'; गोसावीचा खुलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com