'हा' बॉलिवूड अभिनेता झळकणार हॅालीवुड चित्रपटात!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

एकेकाळीचा आघाडीचा अभिनेता अशी ओळख असणारा हा अभिनेता मागील काही दिवसांपासून चंदेरी पडद्यापासून दूर असला तरी आता तो थेट हॅालीवुडमध्ये झळकणार आहे. 

मुंबई : एकेकाळीचा आघाडीचा अभिनेता अशी ओळख असणारा हा अभिनेता मागील काही दिवसांपासून चंदेरी पडद्यापासून दूर असला तरी आता तो थेट हॅालीवुडमध्ये झळकणार आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॅालीवुडमध्ये आपल्या कमालीच्या फिटनेससाठी प्रसिद्द असणारा सुनील शेट्टी आहे. सुनील हा हॅालीवुडच्या ‘कॉल सेंटर’या आगामी चित्रपटातून पुनरागमन करणार असून यात तो एका पंजाबी पोलिसाची भूमिका साकारणार आहे. 

कॅाल सेंटर हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन जेफरी चिन हे कऱणार आहेत. भारतातील एका कॅाल सेंटरने अमेरिकेच्या नागरिकांची दूरध्वनीद्वारे फसवणूक करत तब्बल ३८१ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा घोटाळा केला होता. दरम्यान या सर्व प्रकरणाचा छडा एका पंजाबी पोलिस अधिका-याने लावला होता. याच सत्य घटनेवर कॅाल सेंटर हा चित्रपट आधारीत असून सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण चीनमध्ये सुरु आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this Bollywood actor to be featured in Hollywood movie