आईला आवडली, फक्त मुलाकडून... ह्रतिकच्या नव्या गर्लफ्रेंडचं कौतूक|Bollywood Actor Hrithik Roshan Saba Azad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan And Saba Azad

आईला आवडली, फक्त मुलाकडून... ह्रतिकच्या नव्या गर्लफ्रेंडचं कौतूक

Bollywood Celebrity: ह्रतिकचं नाव घेतलं तरी त्याच्या चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रियता असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये (entertainment news) ह्रतिकचं नाव घेता येईल. त्यानं आपल्या अभिनय आणि (Hrithik Roshan) डान्सनं देशातील कोट्यवधी चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान (Bollywood Actor) निर्माण केलं आहे. काही महिन्यांपूर्वी त्यानं आपल्या पहिल्या पत्नीला सुझैनला घटस्फोट दिला. त्यांना दोन मुले आहेत. आता ह्रतिकच्या नव्या रिलेशनशिपची चर्चा सुरु आहे. त्याच्या नव्या गर्लफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. ह्रतिकच्या गर्लफ्रेंडचे फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी देखील तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांची दाद मिळवली होती.

ह्रतिकच्या गर्लफ्रेंडचे नाव सबा आझाद असे आहे. तिची काही दिवसांपूर्वी रॉकेट बॉईज नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. त्यामध्ये तिनं प्रसिद्ध शास्त्रज्ञ होमी भाभा यांच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. त्या मालिकेला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता सबाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंना ह्रतिकच्या आईनं कमेंट केली आहे. त्यांनी त्या फोटोंना लाईक्स करुन सबाचं कौतूक केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मनात वेगळीच शंका यायला लागली आहे. त्यापैकी काहींनी तर ह्रतिकच्या नव्या लग्नाची चर्चा तर सुरु नाही झाली....अशाप्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

सबा आझादनं यापूर्वी ह्रतिकच्या कुटुंबियांसमवेत एका मेजवानीच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे दिसून आले होते. त्या बातम्या सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्या होत्या. गेल्या महिन्यापासून ह्रतिक आणि सबाच्या डेटिंगची गेल्या महिन्यापासून चर्चा आहे. मुंबईतील एका हॉटेलमधून ते बाहेर पडत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अद्याप त्या दोघांनीही आपल्या नात्याविषयी कोणत्याही प्रकारची जाहिररीत्या कबुली दिलेली नाही. आपण एकमेकांना डेट करत नसल्याचेही सांगितलं आहे. मात्र नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या डेटिंगची चर्चा आहे.