esakal | IPL 2021: उद्या कोण जिंकणार?, बॉलीवूडच्या अभिनेत्याची भविष्यवाणी
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021: उद्या कोण जिंकणार?, बॉलीवूडच्या अभिनेत्याची भविष्यवाणी

IPL 2021: उद्या कोण जिंकणार?, बॉलीवूडच्या अभिनेत्याची भविष्यवाणी

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आयपीएलचा अंतिम सामना उद्या रंगणार आहे. हा सामना केकेआर आणि चैन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. प्रेक्षकांना आता या मॅचची उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून अंतिम फेरीत कोणते संघ एकमेकांना भिडणार याची चर्चा होती. कोलकाता आणि चैन्नई चुरस उद्या पाहायला मिळणार आहे. उद्याची फायनल कोण जिंकणार याविषयी बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी आपआपली मतं व्यक्त केली आहे. ती सोशल मीडियावर व्हायरलही केली आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये अभिनेता केआरके अर्थात कमाल खाननं (Kamaal R Khan) दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत आहे. त्यानं तर एक भविष्यवाणीच केली आहे. त्याचं ते व्टिट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कमाल खाननं आपल्या व्टिटमध्ये लिहिलं आहे की, माझी पुढची भविष्यवाणी नक्की ऐका. मला असं वाटतं की, चेन्नई उद्याच्या सामन्यामध्ये कोलकाताला हरवल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या सामन्यासाठी चेन्नईचं पारडं जड असणार आहे. कारण त्यांच्याजवळ इयान मोर्गन नावाचा कॅप्टन आहे. त्यामुळे ते जिंकणार नाहीत. कमाल खाननं अशाप्रकारे व्टिट करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसंही बॉलीवूडमध्ये आपल्या हटक्या आणि वादग्रस्त विधानासाठी कमाल खान ओळखला गेला आहे. त्यानं एकप्रकारे इयान मॉर्गनवर निशाणा साधला आहे. त्याच्यामते तो कॅप्टन असल्यानं कोलकाता जिंकू शकणार नाही.

उद्या आयपीएलचा शेवटचा सामना होणार आहे. त्याविषयीची उत्सुकता चाहत्यांना आहे. प्रत्येकाला आपल्या आवडीचा संघ जिंकावा असे वाटते. मात्र प्रत्यक्षात काय होणार हे उद्याच्या सामन्यामध्ये स्पष्ट होणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईचा सामना कोलकाताशी होणार आहे. यंदाचा आयपीएल म्हणावा तसा लोकप्रिय झाला नाही. याला एक कारण कोरोना हे होतं. त्याचा परिणामही आयपीएलवर झाला.

हेही वाचा: Drugs Case: आर्यन खानला ठेवणार सामान्य कैद्यांसोबत

हेही वाचा: आर्यन खानचा मुक्काम तुरुंगातच; कोर्टानं निर्णय ठेवला राखून

loading image
go to top