सैफच्या मेव्हण्याला शिव्यांचा 'ब्रेकफास्ट', मुंबई पोलिसांकडे तक्रार

बॉलीवूडचे नबाव सैफ अली खानची डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे.
Kunal Khemu
Kunal Khemu esakal

Bollywood News: बॉलीवूडचे नबाव सैफ अली खानची (Saif ali khan) डोकेदुखी (entertainment news) वाढवणारी बातमी आहे. ती म्हणजे त्याच्या मेव्हण्याला अभिनेता कुणाल (Kunal Khemu) खेमूला रस्त्यावरच शिवीगाळ करण्यात आली आहे. तो आणि त्याची पत्नी सोहा अली खान (Soha Ali Khan) रविवारी सकाळी घराबाहेर पडले होते. त्यावेळी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याचं झालं असं की, ते आपल्या कुटूंबासमवेत ब्रेकफास्टसाठी बाहेर पडले होते. त्यावेळी एका ड्रायव्हरनं त्यांना शिवीगाळ केल्याचे दिसून आले आहे. कुणालनं (Kunal Kemmu) या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेयर केला आहे. कुणालनं तो फोटो आणि व्हिडिओ मुंबई पोलिसांना देखील टॅग केला आहे.

कुणालनं तो फोटो आपल्या कारमधून घेतला आहे. त्यानं पोलिसांना त्या मेसेजमधून सांगितलं आहे की, मी सकाळी नऊ वाजता माझी मुलगी, पत्नी, शेजारी आणि त्यांची दोन मुले यांच्यासोबत ब्रेक फास्टसाठी बाहेर पडलो होतो. आम्ही सर्वजण जुहूला निघालो होतो. त्यावेळी एका वाहनचालकाच्या बेशिस्तपणाचा फटका आम्हाला बसला. तो फारच वेगानं गाडी चालवत होता. आणि सारखा हॉर्निंग करत होता. गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. एवढेच नाही तर त्यानं त्याची गाडी माझ्या गाडीसमोर आणण्याचाही प्रयत्न केला. अशाप्रकारे त्यानं माझीच नाही तर गाडीत बसलेल्या आम्हा सगळ्यांचा जीव धोक्यात घातला होता.

kunal post
kunal post
Kunal Khemu
Jhund Movie: नागराजच्या 'हलगीनं' पुणेकरांना नाचवलं...

एवढ्यावरच कुणाल थांबलेला नाही. तो पुढे लिहितो, शेवटी मी गाडी थांबवली. गाडीत बसलेल्या मुलांना याप्रकारामुळे धक्काच बसला. त्यानंतर ती व्यक्ती गाडीबाहेर आली आणि त्यानं आमच्यासोबत गैरवर्तन केले. शिवीगाळही केली. गाडीत माझ्यासोबत पत्नी होती. त्याला कशाप्रकारे बोलावे हेही कळत नव्हते. तो विचित्र हातवारे करुन शिवीगाळ करतच होता. जेव्हा मी हा प्रसंग रेकॉर्ड करण्यास सुरुवात केला तेव्हा तो तात्काळ निघून गेला. मी मुंबई पोलिसांना विनंती करतो की, त्या व्यक्तीवर त्यांनी कडक कारवाई करावी.

Kunal Khemu
हर हर महादेव! मोदींनी वाराणसीत वाजवलं डमरू; VIDEO VIRAL

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com