अभिनेता नील नितीन मुकेश लवकरच बनणार बाबा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

'आता आम्ही दोघांचे तीन होणार आहोत,' असे नील नितीन मुकेशने त्याच्या इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

अभिनेता नील नितीन मुकेश याच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. आपली पत्नी रुक्मिणी सहाय ही गरोदर असल्याची गोड बातमी नीलने इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसोबत शेअर केली. नीलचे वडील नितीन मुकेश यांनीही ही गुडन्यूज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

नील आणि रुक्मिणी यांनी मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये उदयपूरमध्ये लग्न केले होते. 'आता आम्ही दोघांचे तीन होणार आहोत,' असे नील नितीन मुकेशने त्याच्या इंन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूरनेही दुसऱ्यांदा बाबा बनणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती. आता नील नितीन मुकेशनेदेखील ही खास बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे.
 

 

Now we will be THREE

A post shared by Neil Nitin Mukesh (@neilnitinmukesh) on

 

... AND NOW THEY WILL BE “THREE” ...

A post shared by Nitin Mukesh (@nitinmukesh9) on

नीलच्या आगामी 'साहो' या सिनेमात तो नेगेटिव्ह रोल करताना दिसेल. या सिनेमात नील सोबतच अभिनेता प्रभास आणि श्रध्दा कपूर आहे.  

Neil Nitin Mukesh and Wife

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood Actor Neil Nitin Mukesh Soon To Be Father