Rocketry The Nambi Effect: 'कसं बायको म्हणेल तसं!' आर माधवनचा मोठा निर्णय|Bollywood Actor R Madhavan movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

R Madhavan movie News

Rocketry The Nambi Effect: 'कसं बायको म्हणेल तसं!' आर माधवनचा मोठा निर्णय

Bollywood movie: बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये मोठी लोकप्रियता मिळवलेला (Bollywood Vs Tollywood) अभिनेता म्हणून आर माधवनची ओळख आहे. तो सध्या चर्चेत आला आहे त्याचे कारण त्याचा रॉकेट्री नावाचा चित्रपट. रॉकेट्री द (Rocketry The Nambi Effect) नांबी इफेक्ट असे त्या चित्रपटाचे पूर्ण नाव आहे. तो इस्त्रोचे शास्त्रज्ञ नांबियार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. यावर्षीच्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये हा चित्रपट दाखविण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाल्याचे दिसून आले होते.

विशेष म्हणजे रॉकेट्री या चित्रपटाचे दिग्दर्शन आर माधवन यानं केलं आहे. (R Madhavan) माधवननं या चित्रपटाचे लेखन देखील केले आहे. त्याच्या या चित्रपटामध्ये बॉलीवूडचा किंग खान शाहरुखनं देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. मात्र त्यासाठी त्यानं कोणत्याही प्रकारचं मानधन घेतलेलं नाही. माधवनच्या मोबाईलवर स्टेटस म्हणून जो नवा विषय होता त्यात रॉकेट्री यांच्या नावाचा समावेश होता. त्यावेळी त्यातील नाविन्य आणि महत्व ओळखून त्यानं या चित्रपटामध्ये काम कऱण्याचा निर्णय घेतला.

आर माधवन यानं रॉकेट्रीच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून नवीन इंनिंग सुरु केली असली तरी त्याला लवकरच ब्रेक लागणार आहे. त्यानं तसं जाहिर केलं आहे.यापुढे पत्नी म्हणेल तसा निर्णय घेणार असल्याचे सांगत यापुढील काळात दिग्दर्शक म्हणून काम करणार नाही. असं सांगितलं आहे. आर माधवनच्या पत्नीला देखील असेच वाटते की, त्यानं त्याच्या अॅक्टिंगवरच लक्ष केंद्रित करावे.

हेही वाचा: Kitchen Kalakar Video: 'किचन कल्लाकार'च्या सेटवर बोलका कोबी

रॉकेट्रीच्या वेळेस आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये प्रसार माध्यमांनी माधवनला एक प्रश्न विचारला. तो त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी होता. येत्या काळात आणखी कोणते चित्रपट दिग्दर्शित करणार आहेस असा तो प्रश्न होता. मात्र यावेळी माधवननं आपल्याला यापुढील काळात दिग्दर्शनात कोणताही रस नसल्याचे सांगतिलं आहे.

हेही वाचा: Viral Memes: 'ज्यांच्या हिंदूत्वात ED, CBI त्यांच्याबरोबर जाणार आम्ही!'

Web Title: Bollywood Actor R Madhavan Movie Rocketry The Nambi Effect Last Movie As Director

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top