esakal | अभिनेत्याच्या पत्नीचा गरीब मुलांसाठी 'ऑनलाईन क्लास'

बोलून बातमी शोधा

bollywood actor r madhavan wife sarita birje teaching poor kids virtually

अभिनेत्याच्या पत्नीचा गरीब मुलांसाठी 'ऑनलाईन क्लास'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन जगभरातून भारताला मदत येण्यास सुरुवात झाली आहे. यात अनेक देशांनी पुढाकार घेतला आहे. भारताला ऑक्सिजन, बेड, व्हॅक्सिन देण्याची जबाबदारी या देशांनी घेतली आहे. यासगळ्यात बॉलीवूड़मधील सेलिब्रेटीही मागे नाहीत. त्यांनीही सामाजिकतेचा वसा जपत काही नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा हाहाकार कमालीचा वाढला आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. शिक्षण क्षेत्रावर झालेल्या परिणामुळे विद्यार्थ्यांसह पालकही चिंतेत आहे. दहावी - बारावीच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात गरीब विद्यार्थ्यांना सामो-या जाव्या लागलेल्या संकटाचा विचार बॉलीवूडमधील एका अभिनेत्याच्या पत्नीनं केला आहे.

कोरोनाच्या काळात गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षण परवडणारे नाही. याचा विचार करुन प्रसिध्द अभिनेता आर माधवन याची पत्नी सरितानं त्या मुलांसाठी ऑनलाईन क्लास सुरु केला आहे. आर माधवननं सोशल मीडियावर यासंबंधीची एक पोस्ट शेअर करुन माहिती दिलीय. त्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा होतेय. माधवननं लिहिलं आहे की, जेव्हा तुमच्या पत्नीच्या कृतीतून तुम्हाला दिसून येते की, तुम्ही अजून किती लहान आहात. मला जेव्हा कळलं की, माझी देशातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे. त्यावेळी मला तिचा हेवा वाटला. तिचं कौतूकही वाटलं.

माधवनं एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्याची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरुयं. त्या व्हिडिओमध्ये माधवनची पत्नी सरिता बिरजे ही त्या गरीब मुलांचा ऑनलाईन क्लास घेताना दिसत आहे. माधवन जसा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारा सेलिब्रेटी आहे तशी त्याची पत्नी ग्लॅमरस विश्वापासून दूर राहणे पसंद करते. त्यामुळे तिच्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी फार कमी जणांना माहिती आहे.

25 मार्चला आर माधवनं आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यानं लिहिलं होतं, फरहानला रँचोला फॉलो करायचे होते. मात्र व्हायरस नेहमीच त्यांना फॉलो करत होता. मात्र यावेळी त्यांन योग्य व्यक्तिला पकडले आहे. माझ्या प्रकृतीत आता वेगानं सुधार होत आहे.