esakal | 'विदर्भात फिल्मसिटी', संजय दत्तनं घेतली गडकरींची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

'विदर्भात फिल्मसिटी', संजय दत्तनं घेतली गडकरींची भेट

'विदर्भात फिल्मसिटी', संजय दत्तनं घेतली गडकरींची भेट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचे स्थलांतर होणार अशी मोठी चर्चा होती. त्याला बॉलीवूडमधीलच अनेकांनी मोठ्या प्रमाणात विरोधही केला होता. त्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं भेट घेतली होती. त्यांना काही निवेदनंही दिली होती. त्यानंतर त्यावर थोड्या दिवस चर्चा झाली. त्यानंतर ते प्रकरण शांत झाले. आता बॉलीवूडचा बाबा म्हणजे अर्थात संजय दत्त हा चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्यानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. त्या भेटीमागील कारण त्याला विदर्भामध्य़े फिल्म इंडस्ट्री सुरु करायची आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. येत्या दिवसांत त्याबाबतची ठोस माहिती समोर येईल. असेही सांगण्यात आले आहे.

संजय दत्तनं यापूर्वी नितिन राऊत यांचीही जूनमध्ये भेट घेतली होती. त्या भेटीचे कारणही बॉलीवूडशी संबंधित होते. असे सांगण्य़ात आले आहे. कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात मनोरंजन क्षेत्रात बदल झाला आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांना बसला आहे. बॅक स्टेज आर्टिस्ट जे आहेत त्यांनाही मोठ्या प्रमाणात यासगळ्या परिस्थितीची झळ सोसावी लागली आहे. अशाप्रसंगी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या सहकाऱ्यांना मदतीचा हात दिला होता. त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले होते.

बॉलीवूडचं प्रस्थ मोठं आहे. त्यामध्ये नाव कमविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजणं येतात. देशाच्या वेगवेगळ्या भागात आता मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मिती सुरु झाली आहे. त्याला पाठबळ मिळावं, त्यातून स्थानिकांना रोजगार मिळावा अशा विचारातून यापूर्वी मुंबई सोडून इतर ठिकाणी बॉलीवूडची निर्मिती करावी असा विचार काही कलाकारांचा होता. अर्थात त्याला त्यावेळी विरोधही झाला. अनेकांनी टीकाही केली. वास्तविक बॉलीवूडच्या धर्तीवर आणखी काही वेगळा प्रयोग करता येईल का याची चाचपणी बॉलीवूड़च्या काही कलाकारांनी केली होती. असाच प्रयोग संजय दत्तनंही केल्याचे दिसून आले आहे.

त्यानं नुकतीच नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी रामटेक-खिंडसी परिसराची पाहणी संजय दत्तनं केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी नितीन राऊत यांच्या नागपूर येथील बेझनबाग निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती.

loading image
go to top