
'मी नशीबवान माझी तीनही मुलं निर्व्यसनी'
मुंबई - शाहरुखच्या लाडक्या आर्यनची आता घरवापसी झाली आहे. मात्र त्यावरुन अद्याप बॉलीवूडमधील सेलिब्रेटींच्या प्रतिक्रिया काही थांबलेल्या नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून आर्यन खानच्या प्रकरणानं देशाचं लक्ष वेधून घेतले होते. त्या प्रकरणाची सर्वांनी दखल घेतली. त्यात राजकीय, सामाजिक संघटनाही सहभागी झाल्या. आता त्या प्रकरणानं वेगळं वळण घेतल्याचेही दिसून आले आहे. अशावेळी बॉलीवूडमधील आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्यानं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे वेगळ्या बॉलीवूडमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. ते अभिनेते आहेत शत्रुघ्न सिन्हा. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
एकीकडे आर्यन खानला बॉलीवूडमधून पाठींबा मिळाल्याचे दिसून आले. दुसरीकडे काहींनी त्याला ट्रोलही केले. ऋतिक रोशन पासून अभिनेता आर माधवनपर्यत सर्वांनी आर्यनला पाठींबा दिल्याचे दिसून आले. मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवर एनसीबीनं छापा टाकला. त्यामध्ये आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्याच्यासह त्याचे दोन सहकाही मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांचीही जेलमध्ये रवानगी झाली होती. त्यांना तीन दिवसांपूर्वी जामीन मिळाला. आणि त्यांची घरवापसी झाली. यासगळ्या प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, मी नशीबवान आहे की, माझी मुले ड्रग्ज घेत नाहीत, माझी तीनही मुलं गुणवान आहेत. त्यांनी अद्याप कुठल्याही मादक पदार्थांचे सेवन केलेलं नाही. अशाप्रकारे त्यांनी आर्यन खान प्रकरणावर आपले विचार व्यक्त केले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. आर्यनला अटक केली यामागे एनसीबीला शाहरुखसोबतचा मागचा हिशोब पूर्ण करायचा होता. त्यामुळे आर्यनला विनाकारण जेलमध्ये जावे लागल्याचेही शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी सांगितले. मी नेहमीच व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केले आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार केला आहे. सगळ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहायला हवे. असे माझे मत आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित कोणत्याही जाहिरात करायच्या नाहीत. हेही ठरवून घेतल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
हेही वाचा: आर्यन खानला वाचविण्यात सरकारला रस ; विनायक मेटे
हेही वाचा: आर्यन 'मन्नत'वर आल्यानंतर शाहरुख-गौरीने घेतला एक महत्त्वाचा निर्णय
Web Title: Bollywood Actor Shatrugha Sinha Comment On Aryan Khan Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..