
Top Celebrities List : भारतातल्या सर्वोत्तम 10 अभिनेत्यांमध्ये 7 टॉलीवूडचेच, अभिनेत्रींमध्ये पहिलं नावही दाक्षिणात्यच
Ormax Most popular male film stars in India : बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यासगळ्यात आता भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अशा सेलिब्रेटींची यादी समोर आली आहे. त्यामध्ये बॉलीवूडच्या फक्त तीनच अभिनेत्यांची नावं असून बाकी सर्व टॉलीवूडच्या अभिनेत्यांचीच नावं आहेत.
ऑरमॅक्सच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या त्या यादीमध्ये हिंदी कलाकारांना टॉलीवूडच्या अभिनेत्यांना मागे टाकल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून टॉलीवूडचा बोलबाला राहिला असून यात बॉलीवूडला टक्कर देण्याचे काम साऊथ इंडियन चित्रपटांनी केले आहे. आता तर दाक्षिणात्य दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला आहे.
Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
टॉप अभिनेते आहे तरी कोण?
या यादीमध्ये पहिल्या स्थानावर विजय असून दुसऱ्या स्थानी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आहे. तिसऱ्या स्थानी प्रभास पुढे अनुक्रमे अजित कुमार, ज्युनिअर एनटीआर, अल्लु अर्जुन, अक्षय कुमार, सलमान खान , रामचरण आणि यश यांच्या नावांचा समावेश आहे.
ऑरमॅक्सनं व्हायरल केलेल्या त्या यादीमध्ये दहापैकी सहा नावं ही साउथ इंडियन अभिनेत्रींची आहे. तर बॉलीवूडच्या ४ अभिनेत्रींच्या नावांचा त्यात समावेश आहे. पहिल्या दहा अभिनेत्रींमध्ये समंथा ही पहिल्या क्रमांकावर आहे. तर नॅशनल क्रशमध्ये सातव्या क्रमांकावर रश्मिका मंदाना आहे. तर दीपिका आणि आलियानं पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
देशात सर्वोत्तम अभिनेत्री आहे तरी कोण... या यादीमध्ये पहिल्या स्थानावर समंथा रुथ प्रभू असून त्यानंतर अनुक्रमे अलिया भट्ट, दीपिका पदुकोण, नयनतारा, काजल अग्रवाल, त्रिशा, रश्मिका मंदाना, कियारा अडवाणी, कतरिना कैफ आणि अनुष्का शेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे.