काय केलंय आलियानं जेवायला?: लग्नानंतर स्वयंपाकाचा व्हिडिओ व्हायरल|Bollywood Actress Alia Bhatt Coocking | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt

काय केलंय आलियानं जेवायला?: लग्नानंतर स्वयंपाकाचा व्हिडिओ व्हायरल

Bollywood News: बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध कपल्स रणबीर आणि आलियाचं लग्न (Ranbir Kapoor) झालं. त्या लग्नाला बॉलीवूडमधील सेलिब्रेटी हजर होते. यापैकी काहींनी हटकून बोलावणं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे ते आलिया आणि रणबीरचे (Alia Bhatt) कॉमन नावडणारे मित्र होते असे सांगण्यात आले आहे. आलिया (entertainment News) रणबीरच्या लग्नानं सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. गेल्या काही महिन्यांपासून आलिया रणबीरच्या लग्नावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. यासगळ्यात रणबीरची आई नीतु कपूर यांना देखील मीडियाच्या काही प्रतिनिधींनी जेरीस आणले होते. अखेर त्यांनी आपण आलिया रणबीरच्या लग्नाची घोषणा करुन चाहत्यांना सुखद (Social media viral news) धक्काही दिला होता.

आता आलियाचा स्वयंपाक करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी मोठा प्रतिसादही दिला आहे. आलियाचा व्हिडिओ म्हणजे तिचा लग्नानंतरचा पहिल्या रेसिपीचा व्हिडिओ आहे असे नेटकरी समजू लागले आहेत. त्यावरुन तिला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नही नेटकऱ्यांनी विचारले आहे. काय खास डिश बनवली आहे, रणबीरला काय आवडते, सासरी पहिल्यांदा नवी डिश कसा होता अनुभव, यासारखे प्रश्न विचारुन आलियाला नेटकऱ्यांनी भंडावून सोडले आहे. वास्तविक हा आलियाचा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ असून तो पुन्हा एकदा तिच्या लग्नाच्या निमित्तानं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती तिच्या घरीच काही रेसिपी बनवत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Photo viral - तारक मेहतामधील बाबुलालच्या मुलीचं लग्न, चर्चा तर होणारच!

आलिया रणबीरचं 14 एप्रिलला लग्न झालं. यावेळी बॉलीवूडमधील मोजकेच कलाकार उपस्थित होते. आलियाला लहानपणापासूनच रणबीरवर क्रश होतं. असं तिनं एका मुलाखतीतून सांगितलं. त्या दोघांची ओळख अयान मुखर्जी यांच्या एका चित्रपटाच्या निमित्तानं झाली. त्यानंतर ते दोघे एकमेकांना डेट करायला लागले. पाच वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले. आलिया - रणबीरच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, आलियाचा दोन महिन्यांपूर्वी गंगुबाई काठियावाडी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Viral Video: एवढं महत्वाचं आहे का फोनवर बोलणं? पाहा काय घडलंय

Web Title: Bollywood Actress Alia Bhatt Coocking Dish With Actor Ranbir Kapoor Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top