हात फ्रॅक्चर झाला तरी जेनिलीयाची 'पावरी' सुरूच; पाहा व्हिडिओ

genelia dsouza
genelia dsouza

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिलीया डिसूजा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. पती अभिनेता रितेश देशमुख आणि मुलांसोबतचे धमाल मस्तीचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करते. हे व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस पडतात. नुकताच एक भन्नाट व्हिडिओ जेनिलीयाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये जेनिलीयाचा हात फ्रॅक्चर झालेला दिसत आहे. 

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी पार्टीचा उच्चार पावरी असा करते. त्यानंतर हा नवा ट्रेण्ड सोशल मीडियावर लोक फॉलो करायला लागले. जेनिलीयाने याच पावरीचा व्हिडीयो शेअर केला आहे. यामध्ये जेनिलीया म्हणते,'ये हम है, ये हमारी स्केटींग है और ये हमारी रिकव्हरी हो रही है', या व्हिडिओमध्ये जेनिलीया स्केटींग खेळताना दिसली त्यानंतर ती खेळता खेळता पडते. पडल्यामुळे तिचा हात फ्रॅक्चर झाला. 

तिचा हात फ्रॅक्चर झाल्याने तिच्या चाहत्यांनी या व्हिडुओला कमेंट करून काळजी घेण्यास सांगितले. जेनिलीयाच्या आणि रितेशच्या जोडीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. 'तुझे मेरी कसम या' हिंदी चित्रपटाच्या सेटवर जेनिलीया आणि रितेशची ओळख झाली. जेनिलीया आणि रितेश अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2012 साली लग्न केले. जेनिलीया आणि रितेशला राहिल आणि रियान नावाचे दोन मुलं आहेत. काही दिवसांपूर्वी जेनिलीया आणि रितेशने आपल्या मुलांसोबत पूजा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com