esakal | रितेश झाला 'जोरू का गुलाम' ; पाहा Video
sakal

बोलून बातमी शोधा

ritesh genelia

जेनिलीयाच्या आणि रितेशच्या जोडीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याच्या या रोमॅन्टीक व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

रितेश झाला 'जोरू का गुलाम' ; पाहा Video

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री जेनिलीया डिसूजा  आणि तिचा पती अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. ते दोघेही मुलांसोबतचे धमाल मस्तीचे व्हिडीयो सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहत्यांचीसुद्धा व्हिडीओला पसंती मिळते. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये ती मुलगी पार्टीचा उच्चार पावरी असा करते. त्यानंतर नवा ट्रेंण्ड सोशल मीडियावर लोक फॉलो करायला लागले आहेत.

जेनिलीयाने याच पावरी ट्रेंडमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात जेनिलीया म्हणते,'ये हम  ये हमारी स्केटींग है और ये हमारी रिकव्हरी हो रही है', या व्हिडीओमध्ये जेनिलीया स्केटींग खेळताना दिसली त्यानंतर ती खेळता खेळता पडते. पडल्यामुळे तिचा हात फ्रॅक्चर झाला. 

हे वाचा - न्यूड फोटोशूटनंतर आता वनिताचा नवा हॉट फोटो

तिच्या हात फ्रॅक्चर झाल्याने चाहत्यांनी या व्हिडीओला कमेंट करून काळजी घेण्यास सांगितले. त्यानंतर नुकताच एक भन्नाट व्हिडीओ जेनिलीयाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये जेनिलीयाचा हात फ्रॅक्चर झालेला दिसत आहे आणि रितेश तिचे केस बांधून देत आहे. जेनिलीयाच्या आणि रितेशच्या जोडीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याच्या या रोमॅन्टीक व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. जेनिलीया व्हिडीओला कॅप्शन देत म्हणाली, 'मला अशी एखादी व्यक्ती पाहिजे जी माझ्यावर माझ्या सर्वात वाईट वेळी देखील प्रेम करेल'.

हे वाचा - जान्हवीचा हॉट बेली डान्स; पाहा Viral Video

'तुझे मेरी कसम या' हिंदी चित्रपटाच्या सेटवर जेनिलीया आणि रितेशची ओळख झाली. जेनिलीया आणि रितेश अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2012 साली लग्न केले. जेनिलीया आणि रितेशला राहिल आणि रियान नावाची दोन मुलं आहेत. काही दिवसांपूर्वी जेनिलीया आणि रितेशने आपल्या मुलांसोबत पूजा करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

loading image