'रमजान सुरुंय आणि तू...', हुमाच्या कपड्यांवरुन नेटकरी बिघडले|Bollywood Actress Huma Qureshi trolled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Huma Qureshi

'रमजान सुरुंय आणि तू...', हुमाच्या कपड्यांवरुन नेटकरी बिघडले

Bollywood Actress Huma Qureshi: अभिनेत्री हुमा कुरेशी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असते. तिचा लूक आणि अभिनय हा चाहत्यांच्या चर्चेचा विषय (Bollywood Actress) असतो. काही दिवसांपूर्वी हुमाचा टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजित याच्यासोबत वल्लीमाई नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. बॉक्स ऑफिसवर (Box Office) देखील या चित्रपटानं मोठी कमाई केली आहे. बॉलीवूडच्या गंगुबाई काठियावाडीला वल्लीमाईनं (Alia Bhatt) टक्कर दिली होती. त्यात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या हुमा कुरेशीला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. आरआरच्या (RRR Movie) पार्टीमध्ये छोट्या कपड्यांमध्ये गेलेल्या हुमाचा अंदाज हा काही तिच्या चाहत्यांना आवडलेला नाही.

एस एस राजामौली दिग्दर्शित आरआऱआऱची सध्या चर्चा आहे. रामचरण, ज्युनि.एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांची भूमिका असलेल्या आरआआरला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर आतापर्यत या चित्रपटानं तीनशे कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे. अजुनही आरआरआरची घौडदौड सुरु आहे. त्यानिमित्तानं आरआरआरच्या टीमनं एका पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीमध्ये आरआरआरच्या टीममधील अनेकजण उपस्थित होते. मात्र हुमाच्या एंट्रीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या तिच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. दुसरीकडे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तिला रमजानचा महिना सुरु आहे तेव्हा अशाप्रकारचे कपडे परिधान करुन त्या पार्टीमध्ये गेल्यानं चांगलचं सुनावलं आहे.

हेही वाचा: हिंदीत 'The Kashmir Files'चीच दादागिरी ! 'RRR' नं टाकल्या नांग्या

हुमानं त्या पार्टीमध्ये रेड कलरची कोल्ड शोल्डर शॉर्ट परिधान केली होती. त्या आऊटफिटमध्ये सुंदर दिसत होती. मात्र नेटकऱ्यांनी त्यावरुन तिला ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. वास्तविक यापूर्वी देखील हुमाला नेटकऱ्यांनी तिच्या हटके स्टाईलवरुन झापलं आहे. मात्र त्याचा काही एक परिणाम हुमावर झालेला नाही. काही नेटकऱ्यांनी तर तू जे कपडे परिधान केले आहेत त्याऐवजी साडी परिधान केली असती तर आणखी सुंदर दिसली असतीस. काही कट्टरपंथीयांनी तर तिला सध्या रमजानचा महिना सुरु असल्याचे सांगितलं आहे. हुमाच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचे झाल्यास, ती नेटफ्लिक्सच्या वतीनं प्रदर्शित होणाऱ्या मोनिका ओह माय डार्लिंगमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा: RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

Web Title: Bollywood Actress Huma Qureshi Trolled Wearing Short Dress Rrr Success Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top