esakal | इलियाना 'अंडरवॉटर',फोटोशुट भन्नाट

बोलून बातमी शोधा

bollywood actress ileana d cruz
इलियाना 'अंडरवॉटर',फोटोशुट भन्नाट
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझचे नाव बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिध्द आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणूनही तिचे नाव घेतले जाते. इंस्टावरही तिलाही फॅन फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. सध्या ती चर्चेत आहे याचे कारण म्हणजे तिनं केलेलं अंडर वॉटर स्कूबा डायव्हिंग. त्यामुळे तिच्या फॅन्सनं तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. यावेळी इलियानं आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. भलेही इलियाना तिच्या अभिनयामुळे जास्त काळ चर्चेत राहत नसेल मात्र तिच्या वेगवेगळया फोटोंमुळे ट्रेंडिंग असण्यात इलियानाला विशेष आनंद आहे.

सध्या इलियाना भलतीच चर्चेत आहे त्याचे कारण तिचं व्हायरल होत असलेलं स्कूबा डायव्हिंग आणि त्याचे फोटो. इलियानानं इंस्टावर वेगवेगळ्या फोटोंचा अल्बम तयार केला आहे. त्या फोटोंकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी तिला लाईक्स आणि कमेंटही केल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या घ़डीला इलियाना सर्वांच्या चर्चेचा विषय आहे.

यापूर्वी देखील इलियाना तिच्या ऑफस्क्रिन गोष्टींमुळे वादाच्या भोव-यात सापडली होती. यामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे. आताच्या तिच्या फोटोंमध्ये ती वेगळ्या लुकमध्ये दिसते आहे. तिच्या चाहत्यांना तो लूक आवडला असल्यानं त्यांनी तिला मोठ्या प्रमाणावर कमेंटही दिल्या आहेत. तिच्या फोटोशुटला फॅन्सनं पसंती दर्शवली आहे.

या फोटोंमध्ये आपण पाहु शकतो की, इलियाना ही एका समुद्रकिनारी बसली आहे. त्यावेळी तिनं एका बोटीच्या वर उभं राहून फोटो घेतला आहे. इलियानाचा हा अंदाज अनेकांना भावला आहे. इलियानाचे हे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाले आहे. ती आता तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय आहे.

इलियानाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, ती लवकरच अनफेयर आणि लवली नावाच्या एका चित्रपटामध्ये दिसणार आहे. यापूर्वी ती अभिषेक बच्चनच्या द बिग बुलमध्ये दिसली होती. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केलं होतं. तर अजय देवगण, विक्रांत शर्मा आणि कुमार मंगत यांनी निर्माता म्हणून काम पाहिले. त्यात इलियाना एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसली आहे.