esakal | कोण आहेत जान्हवी कपूरचे 'खास' पाहूणे; ज्यांना स्पेशल स्क्रिनिंगला केले आमंत्रित
sakal

बोलून बातमी शोधा

janhavi kapoor roohi

नुकतंच अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'रुही'या चित्रपटाचं स्क्रिनिंग सोमवारी मुंबईत पार पडलं. स्क्रिनिंगला जान्हवीने काही खास पाहूण्यांना आमंत्रीत केले होते.

कोण आहेत जान्हवी कपूरचे 'खास' पाहूणे; ज्यांना स्पेशल स्क्रिनिंगला केले आमंत्रित

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री जान्हवी कपूर वेगवेगळ्या चित्रपटांमधून नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तिच्या अभिनय आणि डान्सचे अनेक चाहते आहेत. नुकताच तिचा 'रूही' या  हॉरर कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यातील गाणी देखील प्रदर्शित झाली आहेत. चित्रपटातील गाण्यांमध्ये जान्हवीने केलेल्या नृत्याने प्रेक्षकांची मन जिंकली. 

नुकतंच अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'रुही'या चित्रपटाचं स्क्रिनिंग सोमवारी मुंबईत पार पडलं. स्क्रिनिंगला जान्हवीने काही खास पाहूण्यांना आमंत्रीत केले होते. हे खास पाहूणे आहेत तरी कोण हा प्रश्न स्क्रिनिंगला आलेल्या प्रत्येकालाच पडत होता. नंतर कळाले की, तिच्या असिस्टंटच्या परिवारातील सदस्यांना जान्हवीने चित्रपट पहायला आमंत्रीत केले होते.

स्क्रिनिंगच्या व्हिडीओमध्ये जान्हवी असिस्टंटच्या बाळासोबत खेळताना दिसत होती. फोटोग्राफर्सनी तिला असिस्टंटच्या परिवारासोबत पोज देण्याची विनंती केली, तेव्हा ती आनंदाने तयार झाली. फोटोमध्ये त्या असिस्टंटसोबत त्याची तीन मुले आणि त्याची पत्नी दिसत आहे. त्याच्या लहान मुलाला जान्हवीने कडेवर घेतलं आहे तर इतर दोन मुलं मात्र फोटोसाठी पोज देण्यात व्यग्र दिसत होते.

हे वाचा - महिला दिनानिमित्त प्रार्थनाचं खास फोटोशूट; कष्टकरी महिलांना केला सलाम

जान्हवीच्या या प्रेमळ स्वभावावर तिचे चाहते खूश झाले. एकाने लिहिलं आहे की, 'जान्हवी ही सगळ्या नम्र स्टारकीड आहे. ज्या पद्धतीने तिचं बोलणं, वागणं आहे, त्यातून तिच्यावर श्रीदेवीने किती चांगले संस्कार केले आहेत हे दिसून येत आहे.' तर या फोटो आणि व्हिडीओमुळे तिने नवे चाहते बनले आहेत.

एका चाहत्याने अशी कमेंट केली की, 'ती किती निर्मळ आहे. मी तिच्याबद्दल गैरसमज करून घेतला. पण जान्हवी, आता मी तुझा चाहता झालो आहे.” या सोहळ्यासाठी जान्हवीचे खास पाहुणे उपस्थित होते आणि विशेष म्हणजे तिचे त्यांच्यासोबतचे फोटोज पाहून तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत. सोशल मीडियावरही तिचे हे फोटोज खूप व्हायरल होऊ लागले आहेत.

loading image