CAA च्या समर्थानात उतरली जुही चावला, मोदींचं तोंडभरुन कौतुक

Bollywood actress Juhi chawla reaction on CAA and NRC
Bollywood actress Juhi chawla reaction on CAA and NRC

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) या दोन मुद्दय़ांवर देशभर तीव्र आंदोलन सुरु आहे. देशभरातून लोक, विद्यार्थी आणि सेलिब्रिटीदेखील रस्त्यावर उतरले आहेत. तर, दुसरीकडे सोशल मीडियावरही नेटकऱ्यांमध्ये समर्थन आणि विरोधाचा वाद पेटला आहे. या सर्व प्रक्रियेत बॉलिवूडनेही उडी घेतलेय आणि त्यांच्यातही दोन गट असल्याचं दिसून येत आहे. अनेकजण विरोध करत आहेत तर काहींनी मोदींचं सर्मथनही केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाही आता या यादीमध्ये सामिल झाली आहे. 

जुही चावलाने CAA ला सर्मथन दिलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली आहे. जुही मोदींचं कौतुक करताना म्हणाली, "इथे उपस्थित असणाऱ्यांपैकी किती जणांनी गेल्या पाच वर्षात कामातून एकही सुट्टी घेतली नाही. अशी एकच व्यक्ती आहे ज्याने गेल्या पाच वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही ती म्हणजे आपले पंतप्रधान. मी कोणत्याही पक्षाविषयी किंवा राजकारणाविषयी बोलत नसून केवळ एका सामान्य व्यक्तीविषयी बोलत आहे जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. मोदी नेहमीच देशाच्या विकासाविषयी बोलत असतात. विकासासाठी काय केलं जाऊ शकतं याचा सतत विचार करतात."

ही पुढे म्हणाली," सर्वजण आम्हाला अचानक CAA विषयी प्रतिक्रिया देण्यास सांगतात. देशामध्ये काहीतरी घटना घडते आणि त्याविषयी मीडिया आम्हाला काय वाटते हे विचारते. आम्हाला अजुन संपूर्ण घटना काय आहे हेच माहित नाही. लोकांनाही तो मुद्दा कळलेला नाही आणि तुम्हा प्रश्न विचारता. NRC आणि CAA विषयी त्यांना आधी समजून घेऊ देत. नेहमीच आमच्याकडून एका प्रतिक्रियेची अपेक्षा करता. सर्वजण इतक्या लगेचच सरकारला चुकीचं का ठरवत आहेत ?''

जुही चावलाने मुंबईत भाजपाकडून आयोजित निषेध कार्यक्रमात हजेरी लावली. याच कार्यक्रमादरम्यान जुहीने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली. 'फ्री कश्मीर प्लेकार्ड प्रोटेस्ट' मध्ये ती सहभागी झाली होती. तुकडे तुकडे गँगकडून काश्मीर मुक्त करण्याच्या घोषणा दिल्या जात असल्याचा निषेधार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या आंदोलनामध्ये अभिनेता दिलीप ताहील, भाजपा नेते सुधीर मुंनगंटीवार आणि गोपाल शेट्टी ही मंडळीही सहभागी होती. भाजप कार्यकर्त्यांना यावेळी उद्धव ठाकरे सरकराविरोधात घोषणाबाजी केली. जुहीच्या या प्रतिक्रेयवर आता सोशल मीडियावर पडसाद उमटले आहेत.नेटकऱ्यांनी तिच्या या प्रतिक्रेयवर उलट सुलट मतं मांडली आहेत.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com