राणी कधी येणार इंस्टावर? काजलला असा प्रश्न विचारल्यावर तिनं...

ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह राहणारी (Bollywood news) अभिनेत्री आहे.
kajol and rani
kajol and rani esakal

Entertainment: बॉलीवूडमध्ये (Bollywood Actress) नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असणारी अभिनेत्री म्हणून काजोलच्या (Kajol) नावाचा उल्लेख करावा लागेल. ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह राहणारी (Bollywood news) अभिनेत्री आहे. काजोलनं चाहत्यांना महिला दिनाच्या (Womens day) निमित्तानं चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी काही नेटकऱ्यांनी तिला वेगळाच प्रश्न विचारला त्याला काजोलनं दिलेलं उत्तर लक्ष वेधून घेताना दिसत आहे. काजोलला चाहत्यांनी राणी मुखर्जी विषयी प्रश्न विचारले आहेत.

सोशल मीडियावर काल महिला दिनाच्या औचित्यानं फॅन्सनं काजलला राणी मुखर्जीच्या बाबत एक प्रश्न विचारला होता. त्यावर काजलनं दिलेलं उत्तर हे चर्चेत आलं आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युझर्सनं तिला लिहिलं होतं की, आम्हाला प्लिज राणीविषयी काही सांग. ती अजुनही इंस्टावर का नाही? त्यावर काजलनं गंमतीशीर उत्तर दिलं आहे. मी आता यासगळ्या गोष्टीवर मी राणीला फोन लावते आहे. कारण ही खरचचं खूप गंभीर आहे. अशा प्रकारची गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. ती चर्चेत आली आहे. अनेकांना एक गोष्ट माहिती नसेल. ती म्हणजे, काजोल ही राणीची एका नात्यानं बहीण लागते.

kajol and rani
Movie Review: निराशाजनक, कंटाळवाणा, रटाळ असा A Thursday

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. मात्र ती सोशल मीडियावर म्हणावी अशी सक्रिय नसते. यावरुन तिच्या चाहत्यांनी तिला नव्हे तर काजोलला प्रश्न विचारला होता. ती इंस्टावर का नाही? काजोल आणि राणीनं कभी खूशी कभी गम आणि कुछ कुछ होता है नावाचे चित्रपट केले होते. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. काजोलच्या सध्याच्या प्रोजेक्टबद्दल सांगायचे झाल्यास तिनं आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. त्रिभंगा नावाच्या चित्रपटात ती दिसली होती. तर राणीनं बंटी और बबलीचा दुसऱ्या भागात काम केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com