Malaika Arora: 'नका हो असं बोलू!, घरच्यांना होतो त्रास'

सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी (bollywood news) अभिनेत्री म्हणून मलायकाच्या नावाचा उल्लेख (bollywood Actress) करावा लागेल.
Malaika Arora
Malaika Arora esakal

Viral News: सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी (bollywood news) अभिनेत्री म्हणून मलायकाच्या नावाचा उल्लेख (bollywood Actress) करावा लागेल. आपल्या बोल्डनेसमुळे मलायकाचे (Malaika Arora) लाखोंच्या संख्येनं फॉलोअर्स आहेत. अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) नावानं मलायका अनेकदा ट्रोल होत असते. आता तिनं यावरुन ट्रोलर्सला भावनिक आवाहन केलं आहे की, त्यांनी माझ्या कुटूंबियांकडे पाहावे. त्यांना यासगळ्याचा त्रास होत असल्याची प्रतिक्रिया एका मुलाखतीतून दिली आहे.

मलायकानं पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्याला ज्याप्रकारे ट्रोल केले जाते त्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. तिनं म्हटलं आहे की, माझ्या कुटूंबियांनी मला यावरुन विचारणा केली. तेव्हा माझ्याकडे त्यांना द्यायला उत्तर नव्हते. मलायका तुझ्याबाबत अमूक एखादी माहिती आमच्या कानावर आली हे खरं आहे का, त्यावेळी मला त्यांना काय उत्तर द्यावं कळत नाही. त्यांची काळजी योग्य आहे. मात्र हा सगळा प्रकार ट्रोलर्स लक्षात घ्यायला तयार नाही. तेव्हा ट्रोलर्सनं बॉलीवूड सेलिब्रेटींचा आदर करायला हवा.

Malaika Arora
Jhund Movie Review: प्रवाहाबाहेरील टीमची व्यवस्थेला 'कीक'

एका मुलाखतीच्या दरम्यान मलायकानं सांगितलं, दरवेळी कोणत्याही गोष्टीवरुन नेटीझन्स मला ट्रोल करतात. आपण बोलताना काय बोलतो, कसे शब्द वापरतो याचे जराही ते भान ठेवायला मागत नाही. यासगळ्याच परिणाम माझ्यासहित कुटूंबियांवर होतान दिसतो आहे. यापूर्वी देखील मी नेटकऱ्यांना यासगळ्याबाबत आवाहन केलं होतं की, त्यांनी व्यक्त होताना काळजी घ्यावी. सोशल मीडियावरुन फार सहजपणे बदनामी केली जात आहे. जेव्हा हॉलीवूडमधील सेलिब्रेटी त्यांच्या फॅशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात त्याचे कौतूक होते. मात्र आम्ही करायला गेलो की, लगेच ट्रोल केले जाते. हे चूकीचं असल्याचं मलायकानं म्हटलं आहे.

Malaika Arora
हर हर महादेव! मोदींनी वाराणसीत वाजवलं डमरू; VIDEO VIRAL

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com