'राम तेरी गंगा मैली' च्या मंदाकिनीचा 26 वर्षांनी पुन्हा दिसणार जलवा|Bollywood Actress Mandakini Ram teri ganga maili | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress mandakini

'राम तेरी गंगा मैली' च्या मंदाकिनीचा 26 वर्षांनी पुन्हा दिसणार जलवा

Bollywood News: बॉलीवूडच्या चाहत्यांना मंदाकिनीचे (bollywood actress Mandakini) नाव माहिती नाही असे (Bollywood Movie) होणार नाही. खासकरुन 70 ते 80 च्या दशकातील चाहत्यांना मंदाकिनीबद्दल माहिती आहे. तिचा राम तैरी गंगा मैली हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यातील एका सीनमुळे ती वादाच्या भोवऱ्यातही सापडली होती. त्यावेळी तिनं त्या चित्रपटातून दिलेल्या बोल्ड सीनची आजही चर्चा होती. काही काळानंतर मंदाकिनीनं बॉलीवूडपासून फारकत घेतली. (Ram Teri Ganga Maili) मात्र तिच्या चाहत्यांसाठी आता गोड बातमी आहे. ती म्हणजे तब्बल 26 वर्षानंतर मंदाकिनी ही पुनरागमनासाठी तयार आहे. एका (Entertainment News) प्रोजेक्टव्दारे मंदाकिनी ही कमबॅक करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या कमबॅकची चर्चा होती.

राम तेरी गंगा मैली हा मंदाकिनीचा पहिलाच चित्रपट होता. त्यावेळी त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मंदाकिनी या चित्रपटामुळे लाईमलाईटमध्ये आली होती. मंदाकिनी ही आता एका म्युझिक व्हिडिओमधून कमबॅक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये तिचा मुलगा रब्बील ठाकुर हा देखील दिसणार आहे. मंदाकिनीचा हा म्युझिक व्हिडिओ साजन अग्रवालनं दिग्दर्शित केला आहे. मंदाकिनीसोबत काम करण्याचा अनुभव याविषयी त्यानं सांगितलं, मंदाकिनी या माझ्या गावच्या आहेत. त्या मोठ्या अभिनेत्री आहेत. त्यांच्याविषयी खूप काही ऐकलेही आहे. मेरठमधून आलेल्या साजननं हे गाणं मोठ्या मेहनतीनं तयार केले आहे. त्यातून त्यानं आईची महती सांगितली आहे. या गाण्यातून मंदाकिनी आणि त्यांचा मुलगा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

हेही वाचा: Audience Review: मी वसंतराव - संघर्षाचा सांगीतिक प्रवास

मंदाकिनी यांच्या या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, गीतलेखन साजनने केले आहे. तर संगीत बबली हक आणि मीरानं दिले आहे. ऋषभ गिरीनं ते गाणं गायलं आहे. गुरुजी कैलास रायगरनं हे गाणं प्रोड्युस केलं आहे. या गाण्यानंतर मंदाकिनी एका शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या राम तेरी गंगा मैला या राज कपूर दिग्दर्शित चित्रपटातून मंदाकिनी यांनी बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती.

हेही वाचा: RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

Web Title: Bollywood Actress Mandakini Ram Teri Ganga Maili Movie Comeback Music Album

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..