अभिनेत्री मिनिषा लांबा 5 वर्षानंतर पतीपासून विभक्त

अभिनेत्री मिनिषा लांबा 5 वर्षानंतर पतीपासून विभक्त

मुंबईः अभिनेत्री मिनिषा लांबा आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे.  2005 साली यहां या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री मिनिषा लांबाला खऱ्या अर्थी लोकप्रियता मिळाली ती सन 2008 मधील बचना ए हसिनो या चित्रपटामुळे. त्यानंतर तिने जिला गाझियाबाद, भेजा फ्राय, किडनॅप अशा काही चित्रपटांमध्ये काम केले आणि नंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. 2015 मध्ये बिझनेसमन रयान थाम याच्याशी लग्न केले. 

रयान थाम आणि तिची ओळख एका नाईट क्लबमधील पार्टीमध्ये झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये आणि नंतर लग्नामध्ये झाले. मिनिषा आणि रयानच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली होती. 2013 ला त्यांनी लग्न केलं होतं. 2017 मध्ये तिने भूमी नावाचा शेवटचा चित्रपटही केला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून तिच्या आणि पतीमध्ये काहीसे वाद होत असल्याच्या चर्चा कानावर पडल्या होत्या. ते दोघेही वेगवेगळे राहात होते. 

मात्र आता त्यांनी रितसर घटस्फोट घेतला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून आता ते विभक्त झाले आहेत. मिनिषा लांबाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही आता वेगळे झालो आहोत. आमची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे मिनीषाने एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली.

(संपादनः पूजा विचारे) 

bollywood actress minissha lamba ryan tham divorced

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com