'लग्न झालेल्या पुरुषांच्या प्रेमात पडल्यावर'

अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जातात.
'लग्न झालेल्या पुरुषांच्या प्रेमात पडल्यावर'

मुंबई - अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जातात. गेल्या वर्षी त्यांचं सच कहू तो नावाचं आत्मचरित्र प्रकाशित झालं होतं. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यातील धक्कादायक खुलाशांना सोशल मीडीयातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाला आहे. गुप्ता यांचे परदेशी खेळाडूशी लग्न करणं, त्यांचा घटस्फोट, त्यांना लहानपणी सामोरं जावं लागलेल्या अनेक अत्याचाराचं कथनही त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये केला आहे. आताही त्या एका प्रतिक्रियेमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सांगितलं आहे की, एखाद्या लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडणे अतिशय मानसिक दु;ख देणारे असते. त्यातून हाती निराशा येते. त्याचा त्रास होतो. अशी प्रतिक्रिया गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांना एका पुस्तकातील उदाहरण वाचून दाखवले आहे. तर तुम्ही लग्न झालेल्या पुरुषाशी प्रेम करता आहात तर तुम्ही काजळ लावण्याची गरज नाही. असे त्यांनी म्हटले आहे. गुप्ता यांनी आपल्या इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नीना गुप्ता यांनी सांगितलं आहे की, मी नुकतचं एका लेखकाचं पुस्तक वाचलं. त्यामध्ये असं लिहिलं होतं की, तुम्ही जर एखाद्या लग्न झालेल्या लेखकाच्या प्रेमात पडता आहात तर तुम्ही अधिक सजग राहणे गरजेचे आहे. तुम्ही त्यावेळी डोळ्यांना काजळ लावू नका. खरं काय आहे ते कळू द्या...समजलं ना...अशा शब्दांत गुप्ता यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओला गुप्ता यांनी सच कहू तो या नावानं शेयर केलं आहे. त्याला आतापर्यत हजाराहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. पुरुष लग्न झालेला असो किंवा नसो त्यानं काही फरक पडत नाही. अशा प्रकारची कमेंट दिली आहे.

'लग्न झालेल्या पुरुषांच्या प्रेमात पडल्यावर'
'लहानपणी डॉक्टरनं केलं शोषण'; अभिनेत्री नीना गुप्ता यांचा खुलासा
'लग्न झालेल्या पुरुषांच्या प्रेमात पडल्यावर'
अभिनेत्री नीना गुप्ताला का चिडल्या? Video झाला व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com