अभिनेत्री नेहा धुपिया अडकली विवाहबंधनात !

गुरुवार, 10 मे 2018

नेहा धुपियाने तिचा मित्र अंगद बेदी याच्याशी विवाह केला आहे. याबाबतचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर सगळीकडे याबाबत चर्चा सुरु आहेत. 

नवी दिल्ली : सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या विवाहाची चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया विवाहबंधनात अडकली आहे. नेहा धुपियाने तिचा मित्र अंगद बेदी याच्याशी विवाह केला आहे. याबाबतचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर सगळीकडे याबाबत चर्चा सुरु आहेत. 

बॉलिवूड सेलिब्रिटी नेहा धुपियाने विवाहाची सुखद घोषणा केली. तिने तिचा मित्र अंगद बेदीशी विवाह केल्याचे सांगितले. त्यांच्या विवाहाबाबत अफवा पसरविण्यात आल्या होत्या. नेहा धुपियाने शिख समाजातील अंगद बेदी यांच्याशी विवाह केला. याबाबत तिने फोटोही टाकले आहेत. हा माझा आयुष्यातील मोठा निर्णय आहे. आज मी माझ्या मित्रासोबत आहे. आता मी त्याच्याशी विवाह केल्याने आता तो माझा पती झाला आहे. मी आता मिसेस बेदी झाली आहे.