'दिलबर गर्ल' नोरा प्रसिद्ध कोरियोग्राफर्सच्या प्रेमात, डेटिंग सुरु... | Bollywood Actress Nora Fatehi Fall Love | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Nora fatehi

'दिलबर गर्ल' नोरा प्रसिद्ध कोरियोग्राफर्सच्या प्रेमात, डेटिंग सुरु...

Terence Lewis On Dating Nora Fatehi: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध डान्स शो (Tv Entertainment) मध्ये परिक्षक म्हणून नोरा फतेही (Actress Nora fatehi) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. वास्तविक सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वात हॉट सेलिब्रेटी म्हणून नोराचे नाव घ्यावे लागेल. अल्पावधीतच तिनं आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे. तिचा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे. तिच्या रिलेशनशिपच्या वेगवेगळ्या गोष्टी यापूर्वी चाहत्यांच्या (Bollywood Actress) कानावर आल्या आहेत. आता ती तिच्या एका जवळच्या कोरिओग्राफर्सच्या प्रेमात पडल्याची चर्चा व्हायरल झाली आहे. यापूर्वी देखील त्या डान्सरमुळे ते दोघेही चर्चेत आले होते. नोरानं बॉलीवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे.

नोरा आणि कोरिओग्राफर्स टेरेंस लुईस यांची मैत्री अनेकांना माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये टेरेंसनं तिच्यासोबत बेशिस्त वर्तन केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला होता. त्यावरुन टेरेंसला प्रेक्षकांची माफीही मागावी लागली होती. तेव्हापासून त्या दोघांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या निमित्तानं समोर आली होती. आता हे दोन्ही सेलिब्रेटी एकमेकांना डेट करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नोरा जेव्हा डान्स इंडिया डान्सच्या सेटवर जाते तेव्हा तिचा आणि टेरेंसचा वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतो. एका मुलाखतीमध्ये टेरेंसनं सांगितलं आहे की, आमच्यातील केमिस्ट्री चांगली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना दोन्ही सेलिब्रेटींच्या लव स्टोरीचा अंदाज आला आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

नोरा आणि तू रिलेशनशिपमध्ये आहे अशी चर्चा सुरुयं त्यावर काय सांगशील असा प्रश्न टेरेंसला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, मला नोराचे खूप कौतूक वाटते. ती प्रभावी डान्सर आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो कऱणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. जी गोष्ट गुपित आहे ती गुपितच असलेली चांगली. जे काही सांगायचे ते मला जाहिरपणे सांगता येणार नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. आणि मला असे वाटते आमची केमिस्ट्री चांगली आहे. मला एक गोष्ट सांगायला आवडेल की नोरा ही खूप स्वतंत्र व्यक्ती आहे. मला ती आवडते हेही खरं आहे. अशा शब्दांत टेरेसनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: Poster Viral: 'हरिओम' मधले ते दोन मावळे आहे तरी कोण?

Web Title: Bollywood Actress Nora Fatehi Fall Love In Terence Lewis Dance India Dance Show Relation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top