प्रियांकानं सांगितलं मंगळसूत्र घालण्याचं कारण, 'मला तर...'

सोशल मीडियावर (Social Media) बॉलीवूडची अभिनेत्रींची (Bollywood Actress) मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते.
Bollywood Actress Priyanka Chopra
Bollywood Actress Priyanka Chopra

Priyanka Chopra: सोशल मीडियावर (Social Media) बॉलीवूडची अभिनेत्रींची (Bollywood Actress) मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. त्यांचं राहणं, ते करत असलेली वेशभूषा एवढचं नव्हे तर त्यांच्या मंगळसुत्राची चर्चा चाहत्यांमध्ये असल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडसोबतच हॉलीवूडमध्ये (Hollywood celebrity) देखील आपल्या नावाचा ठसा उमटविणाऱ्या प्रियांका चोप्राचा (Bollywood Actress Priyanka Chopra) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) झाला आहे. त्यासोबतच प्रियांकानं आपल्या मंगळसुत्राविषयी पोस्ट शेयर केली आहे. तिनं आपण मंगळसुत्र का परिधान करतो याविषयी सांगितलं आहे. तिच्या लेखी असलेलं मंगळसुत्राचं महत्व चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

यापूर्वी प्रियांकानं (Priyanka Chopra Video) वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, व्हिड़िओ शेयर केले होते. ती सणवाराच्या निमित्तानं जे फोटो शेयर करते त्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. प्रियांकाचा सोशल मीडियावर लाखोच्या संख्य़ेनं चाहतावर्ग आहे. अमेरिकन कलाकार आणि गायक निक जोन्ससोबत लग्न झालेल्या प्रियांकाच्या फोटोविषयी चाहत्यांना कुतूहल असतं. लग्न झाल्यानंतर तिनं ज्यावेळी पहिल्यांदा मंगळसुत्र परिधान केलं तेव्हा तिच्या मनात नेमक्या काय भावना होत्या. असा प्रश्न चाहत्यांनी प्रियांकाला केला होता. त्यावर तिनं उत्तर दिलं आहे.

Bollywood Actress Priyanka Chopra
Dhanush: एका अफवेने धनुष झाला होता रजनीकांतचा जावई 
View this profile on Instagram

Priyanka (@priyankachopra) • Instagram photos and videos

सध्या प्रियांकानं एका ज्वेलरी ब्रँडचे प्रमोशन केले आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या इंस्टावरुन तिनं पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिनं लिहिलं आहे की, मी सध्या एका ज्वेलरी ब्रँडचे प्रमोशन करत आहे. त्यावेळी मंगळसुत्र परिधान केले आहे. वास्तविक मी जेव्हा ते पहिल्यांदा परिधान केले होते तेव्हा मला त्याचे महत्व कळून आले. वास्तविक मंगळसुत्राचे महत्व समजावून घेत मी लहानाचे मोठी झाली आहे. ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहे हे मी जाणते. एक मॉडर्न महिला जेव्हा मंगळसुत्र परिधान करते तेव्हा तिच्या मनात नेमक्या काय भावना असतात. याची सर्वांनाच उत्सुकता असते. मात्र मला नेहमीच त्या गोष्टीविषयी आदर वाटत आला आहे. आपल्याला या गोष्टी पितृसत्ताक पद्धतीनं तर मिळाल्या नाहीत ना...सध्या त्या गोष्टींचं आणि आपलं नातं काय हे नव्यानं समजावून घेण्याची गरज असल्याचे प्रियांकानं म्हटलं आहे.

Bollywood Actress Priyanka Chopra
Pushpa Box Office : 'पुष्पा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com