video: मीडियासमोरच राखीनं रितेशला केलं 'LipLock'

या अभिनेत्रीनं बिग बॉससारख्या (Bigg Boss Reality Show) रियॅलिटी शो मध्ये देखील सहभाग घेतला होता.
rakhi sawant and ritesh
rakhi sawant and ritesh

Bigg Boss Season 15: टीव्ही मनोरंजन(Tv entertainment) विश्वामध्ये सतत आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणून राखी सावंतच्या (Actress Rakhi Sawant) नावाचा उल्लेख करावा लागेल. या अभिनेत्रीनं बिग बॉससारख्या (Bigg Boss Reality Show) रियॅलिटी शो मध्ये देखील सहभाग घेतला होता. त्यामध्ये तिनं नेहमीप्रमाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. राखीनं त्या शोला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचे दिसून आले होते. आताही राखी चर्चेत आली आहे ते तिच्या लिपलॉक सीनमुळे. तिनं चक्क मीडियाच्या व्यक्तींसमोरच पती रितेशला लिपलॉक केल्याचं दिसून आलं आहे. Bollywood actress rakhi sawant liplock to husband ritesh video viral

बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये राखी सावंत आणि तिचा पती रितेशची (Rakhi sawant husband ritesh) इंट्री झाली होती. त्यामुळे तिला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात चमकण्याची संधीही मिळाली. या दरम्यान राखीनं आपल्या आक्रमक स्वभावानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. तिला प्रेक्षकांकडून प्रतिसादही मिळाला होता. राखीनं लग्न केलं ही बातमीही बिग बॉसमधूनच समोर आली होती. त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता राखीनं पुन्हा एकदा आपला बोल्डनेस नेटकऱ्यांसमोर आणला आहे. त्यामुळे मीडियाच्या प्रतिनिधींना अशावेळी काय बोलावं हा प्रश्न पडल्याचे दिसून आले आहे.

rakhi sawant and ritesh
Video: BBL विजेतेपदाचे 'रक्ताने माखलेले' सेलिब्रेशन

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी ग्रँड फिनालेमध्ये वेगवेगळे सेलिब्रेटी हजेरी लावणार असल्याचे त्या शो च्या प्रोमोमध्ये दिसून आले आहे. त्यामध्ये रुबिना, देवोलिना, रश्मी देसाई, शहनाज गिल यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान या शोची स्पर्धक राखीनं पुन्हा एकदा आपल्या बोल्डनेसनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे बिग बॉसचा जलवा अजूनही नेटकऱ्यांचे मनोरंजन करुन घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे.

rakhi sawant and ritesh
Video: U19 मधला 'जहीर खान', बांगलादेशची उडवली टॉप ऑर्डर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com