सागरिका घाटगे-झहीर खानच्या प्रेमाची गोष्ट...

टीम ई सकाळ
मंगळवार, 25 एप्रिल 2017

झहीर खानने सागरिकासोबतचे छायाचित्र सोशल नेटवर्किंगवर अपलोड केले आणि चर्चेला उधाण आले. क्रिकेटसह बॉलिवडूमधील अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. झहीरला सर्वात अगोदर शुभेच्छा देण्यासाठी अनेकांची धावपळ उडाल्याचे दिसते. झहीरचा सागरिका सोबत साखरपुडा झाल्याचे समजले आणि क्रिकेटपटू अनिल कुंबळेने गडबडीत चुक केली. कुंबळेने ट्विटरवरून झहीर-सागरिकाला शुभेच्छा देताना सागरिका घोषला ट्विट केले अन् गंमत उडाली. अर्थात, काही वेळामध्ये आपली चूक कुंबळेच्या लक्षात आली अन् आपले ट्विट डिलिट करून नव्याने शुभेच्छा दिल्या.

क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री यांचं नातं अनोखं. क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींचे नावे अनेकांसोबत जोडली जातात, हे काही नवे नाही. एकमेकांसोबत नावे जोडली जाण्याची विविध कारणेही आहेत. एकतर चर्चेत येण्यासाठी किंवा गॉसिपींग. परंतु, जोपर्यंत अधिकृत साखरपुडा किंवा विवाह होत नाही, तोपर्यंत हे गॉसिपींगच समजले जाते. भारतीय क्रिकेटपटू झहीर खान याचेही नाव विविध अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. या सर्व प्रकरणावर पडदा पाडत झहीर खानने 'चक दे फेम' अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत साखरपुडा झाल्याचे जाहिर केले.
 

झहीर खानने सागरिकासोबतचे छायाचित्र सोशल नेटवर्किंगवर अपलोड केले आणि चर्चेला उधाण आले. क्रिकेटसह बॉलिवडूमधील अनेकांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. झहीरला सर्वात अगोदर शुभेच्छा देण्यासाठी अनेकांची धावपळ उडाल्याचे दिसते. झहीरचा सागरिका सोबत साखरपुडा झाल्याचे समजले आणि क्रिकेटपटू अनिल कुंबळेने गडबडीत चुक केली. कुंबळेने ट्विटरवरून झहीर-सागरिकाला शुभेच्छा देताना सागरिका घोषला ट्विट केले अन् गंमत उडाली. अर्थात, काही वेळामध्ये आपली चूक कुंबळेच्या लक्षात आली अन् आपले ट्विट डिलिट करून नव्याने शुभेच्छा दिल्या.
 

सोशल नेटवर्किंगवरची माहिती क्षणात जगभर पोहोचते. सागरिका घोषनेही मोठ्या गंमतीने ट्विटला रिप्लाय केला. सागरिका घोष म्हणाली की...'मी तर दोन मुलांची आई आहे.'

ट्विट-रिट्विट असे सुरू झाले आणि नेटिझन्सचे चांगलेच मनोरंजन झाले. झहीर खान याने सागरिका घाटगेसोबतच साखरपुडा केल्याची माहिती पोहोचते न पोहोचते तोच ट्विटिंगसाठी प्रसिद्ध असलेला क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने हटके ट्विट केले आणि पुन्हा चर्चेला उधाण आले.

सेहवाग म्हणाला-
अभिनंदन झहीर, हॉकीवर तू क्लीन बोल्ड झालास, आता घरात हॉकी स्टिक ठेवू नकोस, तुम्हा दोघांना यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा.

क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेझल किचच्या विवाहात पहिल्यांदा सागरिका आणि झहीरचे एकत्र छायाचित्र प्रसिद्ध आले होते. दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा तेव्हापासून सुरु झाली होती. अखेर झहीरने प्रेमाची कबुली दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून झहीरने निवृत्ती स्वीकारली असून सध्या तो दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार आहे. एकीकडे संघ आणि दुसरीकडे साखरपुडा झाल्याने जहीरचा क्लिन बोल्ड झाला आहे. पाहुया...दोन्ही पातळ्यांवर विजयी होण्यासाठी त्याला शुभेच्छा!!!!!

झहीर खान व सागरिका घाटगे दोघेही वेगवेगळ्या धर्मातील आहेत, यावरही सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरू आहे. परंतु, या दोघांच्या अगोदरही विविध क्रिकेटपटूंनी विवाह केले आहेत.

नवाब मंसूर अली खान पतौडी- शर्मिला टैगोर
क्रिकेटपटू मंसूर अली खान पतौडी व अभिनेत्री शर्मिला टागोर सन 1969 मध्ये विवाहबद्ध.

मोहम्मद अझहरुद्दीन- संगीता बिजलानी
भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन व अभिनेत्री संगिता बिजलानी 1996 मध्ये विवाहबद्ध झाले होते. सन 2010 पर्यंत दोघे एकत्र होते, पुढे वेगळे झाले.

अजित आगरकर-फातिमा
भारतीय क्रिकेट संघातील माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर व त्याची मैत्रिण फातिमा 2007 मध्ये विवाहबद्ध झाले

दिनेश कार्तिक-दीपिका पल्लीकल
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू दिनेश कार्तिक व स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकल यांचा गेल्या वर्षी विवाह झाला आहे.

Web Title: Bollywood actress Sagarika Ghatge engages with cricketer Zaheer Khan