'लग्न करायचयं पण अडचण अशी की'...

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 4 March 2021

काही मुलाखतींच्या माध्यमातून शमिताला लग्नाविषयी विचारले होते. सध्या शमिता शिल्पा बरोबरचे फोटो शेअर करत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण अशी शमिता शेट्टीची ओळख आहे. याशिवाय स्वतंत्र अभिनेत्री म्हणून तिनं प्रेक्षकांच्या मनावर फार काळ अधिराज्य केले नाही. मात्र सोशल मीडियावर ती जास्त अॅक्टिव्ह असते. एका मुलाखतीत शमितानं आपल्या बॉलीवूडच्या प्रवासाविषयी सांगितले होते. आपल्याला आजवर ज्या भूमिका मिळाल्या त्या चूकीच्या होत्या. भविष्याचा विचार करुन त्यांची निवड करायला हवी होती. ती माझी चूक असल्याचे शमितानं सांगितले होते. आता शमितानं लग्नाच्या मुद्दयाकडे लक्ष वेधले आहे.

काही मुलाखतींच्या माध्यमातून शमिताला लग्नाविषयी विचारले होते. सध्या शमिता शिल्पा बरोबरचे फोटो शेअर करत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी तिची ब्लॅक विडोज नावाची एक सीरिज प्रदर्शित झाली होती. तसे पाहायला गेले तर नेहमीच शमिता आणि शिल्या यांच्या नावावरुन चर्चा होत असते. आता तर शमितानं स्वताच्या लग्नाविषयी सांगितले होते. आपल्या लग्नात येणा-या अडचणीबद्दल तिनं हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शमितानं सांगितले होते की, मला तर  लग्न करायचं आहे. मात्र मला माहिती नाही की माझा पती कुठे आहे, त्याला आता शोधावे लागणार आहे. मी माझ्या मनातले नेहमी शेअर करते.

मी जे काही सांगते त्याच्यामुळे अडचणीत आले आहे. त्याचा परिणाम माझ्या करिअरवर झाला आहे. मी कुणापासून काही लपवत नाही. माझा प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. सध्या आपण आसपास पाहिले तर काय दिसते, की प्रेमाची जागा व्यवहारानं घेतली आहे. त्याचा परिणाम आपल्या नात्यांवर होताना दिसतो आहे. समाजात आणि लग्नात काय होत आहे, हे जर पाहिले तर घाबरुन जायला होईल. मला कुणाशी लग्न करायचे आहे तर जो आवडेल त्याच्याशी लग्न करायची परवानगी हवी. मला वाटेल त्याच्याशी मला राहण्याची अनुमती हवी. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actress shamita shetty opens on her marriage and life partner