आमिरबाबत एका गोष्टीची नेहमी खंत! सोनाली बेंद्रेचा आठवणींना उजाळा

बॉलीवूडमध्ये 90 च्या दशकात ज्या अभिनेत्रीची मोठी क्रेझ होती त्या सोनाली बेंद्रेनं एका वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा इंट्री केली आहे.
Aamir khan &  Sonali bendre news
Aamir khan & Sonali bendre news esakal

Bollywood News: बॉलीवूडमध्ये 90 च्या दशकात ज्या अभिनेत्रीची मोठी क्रेझ होती त्या सोनाली बेंद्रेनं एका वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा इंट्री केली आहे. (Bollywood Actress) बऱ्याचकाळापासून तिनं बॉलीवूडपासून फारकत घेतली होती. ती टीव्ही मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये देखील तिनं सहभाग घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ही चर्चेत आली आहे. (Entertainment news) तिनं बऱ्याच वर्षांपूर्वी आमिर खानसोबत सरफरोश नावाचा चित्रपट केला होता. त्यातील तिच्या अभिनयाचं कौतूक झालं होतं. त्या चित्रपटातील गाणीही आजही बॉलीवूडच्या चाहत्यांच्या कौतुकाचा विषय असतात.

द ब्रोकन न्युज या वेबसीरिजच्या माध्यमातून सोनालीनं ओटीटीवरुन मनोरंजन (The Broken News) विश्वात पदार्पण केलं आहे. त्या सीरिजच्या प्रमोशनच्या (Ott News) निमित्तानं तिनं आमीरसोबतच्या सरफरोश चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी सोनालीनं आपल्याला आमिरसोबत आणखी वेगवेगळे प्रोजेक्ट करण्याची इच्छा होती. मात्र ते शक्य झालं नाही. तो मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. असं असलं तरी त्याच्यासोबत काम करणं म्हणजे आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. हे मी अनुभवलं आहे. त्याच्यासोबत आणखी चित्रपट करायला आवडलं असतं. असं सोनालीनं म्हटलं आहे.

तब्बल 9 वर्षानंतर सोनालीनं मनोरंजन विश्वामध्ये इंट्री केली आहे. 2013 मध्ये सोनाली वन्स अपॉ़न टाइम इन मुंबईमध्ये दिसली होती. त्यात तिनं कॅमिओ केला होता. त्यानंतर सोनाली बॉलीवूडपासून लांब गेली. मध्यंतराच्या काळात तिला कॅन्सरचा आजार झाला होता. त्या आजाराशी संघर्ष करुन तिनं कॅन्सरवर विजय मिळवला. सोनालीनं कॅन्सर पीडितांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. सोनाली आपल्या अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. तिला ज्या चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या त्या भूमिकांचे सोने केले.

Aamir khan &  Sonali bendre news
Bollywood Top 10 : अमिताभ, शाहरुख, सलमान कोणीच नाही! आहे तरी कोण?

सोनाली आता द ब्रोकन न्युज वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. सोनालीचं म्हणणं आहे की, माझी आणि आमिरची भेट ही सरफरोशच्या निमित्तानं झाली होती. तेव्हा मला त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील असं वाटलं होतं. मात्र आमचा प्रवास सरफरोशच्या निमित्तानं संपला. मी त्याच्याकडून चित्रपटाच्या संबंधात मोलाच्या गोष्टी शिकण्याची संधी गमावली. त्याची मला अजुनही खंत आहे. असं सोनालीनं म्हटलं आहे.

Aamir khan &  Sonali bendre news
Salman khan Threat: मुंबई पोलिसांकडून 200 CCTV जप्त, 10 पथकांकडून वेगानं तपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com