बॉलिवूडची 'मसक्कली' आज अडकणार विवाहबंधनात

मंगळवार, 8 मे 2018

सोनम कपूर विवाहासाठी या साजश्रृंगारात सज्ज झालीय... ​

बॉलिवूडची 'मसक्कली' सोनम कपूर आज विवाह बंधनात अडकणार आहे. व्यावसायिक आनंद अहुजाशी ती लग्न करतेय. या विवाह सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित आहेत. सोनमची काकी कविता सिंह यांच्या घरी सोनम आणि आनंदचा विवाहसोहळा रंगणार आहे. बंगल्यातील मंदिरात विवाहाचे विधी पार पडतील. सोनम कपूर विवाहासाठी या साजश्रृंगारात सज्ज झालीय... तिची ही खास झलक...

sonam kapoor

sonam kapoor

लग्नाच्या आदल्या दिवशी झालेल्या संगीत सोहळ्याचीही सर्वत्र चर्चा आहे. या दिमाखदार संगीत सोहळ्यात सोनम-आनंदचा कपल डान्स, अनिल कपूरचा भांगडा, शिल्पा शेट्टीचे ठुमके, जॅकलिन फर्नांडीसची चिटीया कलाईय्या, करण जोहरचा अंदाज हे सारंच गाजलं. या सर्वांचीच ही खास झलक....
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आज विवाहानंतर कपूर आणि अहुजा कुटुंबीयांतर्फे संध्याकाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरीतील हॉटेल लीला मध्ये आयोजित केलेल्या पार्टीला इंडियन किंवा वेस्टर्न फॉर्मल हा ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood Actress Sonam Kapoor gets married today