'आर्या' परत आलीय...; Aarya 2 टीझर व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'आर्या' परत आलीय...; Aarya 2 टीझर व्हायरल
'आर्या' परत आलीय...; Aarya 2 टीझर व्हायरल

'आर्या' परत आलीय...; Aarya 2 टीझर व्हायरल

मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मितानं आर्या मधून ओटीटीवर इंट्री केली आणि ती कमालीची यशस्वी झाली. चाहत्यांना तिच्या या पहिल्या मालिकेतून तिचा प्रभावी अभिनय पाहायला मिळाला. चित्रपटांपेक्षा या मालिकेमध्ये सुश्मितानं केलेला अभिनय अधिक प्रभावी होता. अशा प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी व्यक्त केल्या आहे. आर्याच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. त्याचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा सुरु आहे.

आंतरराष्ट्रीय एमी नॉमिनेटेड हॉटस्टार स्पेशल्स 'आर्या' चा दुसरा सीझन घेऊन येत आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आर्या परत आली आहे. पहिल्या सीझनच्या शानदार यशानंतर, डिस्ने+ हॉटस्टार, आंतरराष्ट्रीय एमी नामांकित हॉटस्टार स्पेशल, आर्याचा आणखी एक रोमांचक आणि जबरदस्त थरार प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गेल्या काही वर्षांपासून या शोचे चाहते बहुप्रतिक्षित सिक्वेलच्या टीझरसाठी खूप उत्सुक होते. राम माधवानी फिल्म्सकडून पुरस्कार विजेत्या आणि अत्यंत प्रतिभावान राम माधवानी निर्मित, हा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये आर्याच्या दुसऱ्या सीजनमध्ये आर्या सरीनचा प्रवास अधोरेखित करण्यात आला आहे. या टीजरमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन एक वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. तिचा तो लाल रंगात माखलेला लूक लक्ष वेधून घेतो आहे. त्या फोटोमध्ये ती आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कठोरपणे लढणाऱ्या वाघीणीसारखी दिसतेय....

दूसऱ्या सीजनविषयी, दिग्दर्शक राम माधवानी म्हणाले की, ‘‘पहिल्या सीजनसाठी आम्हाला मिळालेले प्रचंड कौतुक आणि प्रेम खूप सुखवणारे होते. इंटरनॅशनल एमी अवार्ड्समध्ये बेस्ट ड्रामा श्रेणीमध्ये झालेले या शोचे नॉमिनेशन आमचा उत्साह वाढवणारा होता. आर्याच्या प्रवासातील पुढचे पाऊल सादर करण्यासाठी मी उत्साहित आहे. ती प्रत्येक पाऊलावर आव्हानांना सामोरे जाते कारण ती आपल्या परिवाराला जिवंत ठेवणे आणि बदला घेण्यासाठी ती आता तयार झाली आहे.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: Movie Review; 'नुसतचं भांडण नको, संवादही हवा'; Meenakshi Sundareshwar

loading image
go to top