राहुल गांधींचं भाषण स्वराला भलतंच आवडलं, ट्विटमध्ये लिहिलं...

चित्रपटापेक्षा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, घडामोडींवर भाष्य करण्यात या अभिनेत्री नेहमीच आघाडीवर असतात.
swara bhaskar and rahul gandhi
swara bhaskar and rahul gandhi

Swara Bhaskar: बॉलीवूडमध्ये (Bollywood Actress) सतत चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये कंगना राणावत (Kangana Ranaut), तापसी पन्नु (Tapsee Pannu) यांच्यानंतर स्वरा भास्करच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. चित्रपटापेक्षा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, घडामोडींवर भाष्य करण्यात या अभिनेत्री नेहमीच आघाडीवर असतात. आताही स्वरा भास्कर ही तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. तिनं कॉग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधीचं सभागृहातील भाषण स्वराला कमालीचं आवडलं असून तिनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले आहे.

यापूर्वी देखील स्वरानं (Reaction on Rahul Gandhi Speech) राहुल गांधीच्या भाषणाची स्तुती केली आहे. आता तिनं राहुलजींच्या त्या भाषणाला सॉलिड स्पीच असं म्हटलं आहे. काल राहुल यांनी सभागृहामध्ये राष्ट्रपती यांचे भाषण आणि मोदींजींचे निर्णय यावरुन सरकारवर हल्लाबोल केल्याचे दिसून आले. त्यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी त्यांनी देशातील बेरोजगारी, चीन, पाकिस्तान आणि पेगासस या मुद्दयांवर देखील जोर दिला होता. त्यावरुन त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. केवळ स्वरा भास्करच नाही तर अभिनेत्री सीमी गरेवाल आणि पुजा भट्ट यांनी देखील राहुल गांधीच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.

swara bhaskar and rahul gandhi
Viral:'मागे तुझ्या फिरतो, झुरतो तुझ्यासाठी': 'श्रीवल्ली'चं मराठी व्हर्जन

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रपती यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात देशातील बेरोजगारीवर एक शब्दही काढला नाही. याबद्दल वाईट वाटल्याचे गांधी यांनी म्हटले होते. याशिवाय भारतानं आपलं लष्करी लक्ष्य असणाऱ्या पाकिस्तान आणि चीनला वेगळं ठेवण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. त्याचा परिणामही आपल्याला भोगावा लागल्याचे दिसून आले आहे. आगामी काळात आपल्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. अशी प्रतिक्रिया राहुल यांनी यावेळी दिली होती.

swara bhaskar and rahul gandhi
Video Viral: घटस्फोटानंतर आमीर खान - किरण राव पुन्हा एकत्र?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com